छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात आगामी काही वर्षांत नव्या १ हजार १२५ कि.मी. रेल्वे मार्गांचे जाळे वाढणार आहेत. यातील काही रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण झाले आहे. काही रेल्वे मार्गांचे ‘डीपीआर’ तयार आहेत, तर काही रेल्वे मार्गांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. हे रेल्वे मार्ग झाल्याने मराठवाड्यातील रेल्वेला खऱ्या अर्थाने ‘स्पीड’ मिळणार आहे.
छत्रपती संभाजीनगर-बीड- धाराशिव या २४० कि.मी. आणि छत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव या ९३ कि.मी. रेल्वे मार्गाचे ऑगस्टमध्ये ‘लिडार’ सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. छत्रपती संभाजीनगर - अहिल्यानगर या ८५ कि.मी. अंतराच्या रेल्वे मार्गाचा ‘डीपीआर’ सहा महिन्यांपूर्वी केंद्राला सादर करण्यात आहे, तर बहुप्रतीक्षित जालना - जळगाव या १७४ कि.मी. अंतराच्या मार्गाचीही भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. सध्या मराठवाड्यातून उत्तर महाराष्ट्रमार्गे दिल्लीला जाण्यासाठी मनमाडमार्गे ३३६ किलोमीटर अंतराचा वळसा मारावा लागतो. जालना - जळगाव रेल्वे मार्गाचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर १७४ किलोमीटरवर येईल. यासह मराठवाड्यात अन्य काही नवे मार्गांनाही मंजुरी देण्यात आली आहे.
सध्या ८८५ कि.मी. अंतराचे रेल्वे मार्गमराठवाड्यात सध्या ८८५ कि.मी. अंतराचे रेल्वे मार्ग आहे.
२७५ कि.मी.चा मार्ग होणार दुहेरीमनमाड (अंकाई) ते परभणी या २७५ कि.मी. अंतराचा मार्ग दुहेरी होणार आहे. यात मनमाड (अंकाई) ते छत्रपती संभाजीनगर या ९८ कि.मी. अंतराच्या मार्गाचे दुहेरीकरण सध्या सुरू आहे, तर छत्रपती संभाजीनगर ते परभणी या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.
असे आहेत नवे रेल्वे मार्ग...मार्ग : अंतर- छत्रपती संभाजीनगर - बीड - धाराशिव : २४० कि.मी.- छत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव : ९३ कि.मी.- बुलडाणा ते लातूर : १३५ कि.मी.- कलबुर्गी - लातूर : १३९ कि.मी.- जालना - खामगाव : १५५ कि.मी.- लातूर - नांदेड : १०४ कि.मी.- जालना - जळगाव : १७४ कि.मी.- छत्रपती संभाजीनगर - अहिल्यानगर : ८५ कि.मी.
अर्थसंकल्पातून मार्गी लागावे काममंजुरी मिळालेल्या काही मार्गांसंदर्भात काहीही झालेले नाही. काहींचे ‘डीपीआर’ झालेले, सर्वेक्षण झाले आहे. अशा रेल्वे मार्गांना आगामी अर्थसंकल्पात मंजुरी मिळावी.- स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक.
Web Summary : Marathwada's rail connectivity is set for a boost with 1125 km of new routes. Surveys and land acquisition are underway for projects like Chhatrapati Sambhajinagar-Beed-Dharashiv and Jalna-Jalgaon, promising faster travel and reduced distances to key destinations.
Web Summary : मराठवाड़ा में 1125 किमी नए रेल मार्गों से कनेक्टिविटी बढ़ेगी। छत्रपति संभाजीनगर-बीड-धाराशिव और जालना-जळगाव जैसी परियोजनाओं के लिए सर्वेक्षण और भूमि अधिग्रहण जारी है, जिससे तेज यात्रा और प्रमुख गंतव्यों की दूरी कम होने की उम्मीद है।