परळीत रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

By Admin | Updated: May 10, 2014 23:50 IST2014-05-10T23:38:17+5:302014-05-10T23:50:39+5:30

संजय खाकरे ल्ल परळी साईनगर- शिर्डी - काकीनाडा एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये धुमाकूळ घालून दरोडेखोरांनी महिला प्रवाशांच्या गळ्यातील दागिने लुटले होते़

Railway passengers question security questionnaire! | परळीत रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

परळीत रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

संजय खाकरे ल्ल परळी साईनगर- शिर्डी - काकीनाडा एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये धुमाकूळ घालून दरोडेखोरांनी महिला प्रवाशांच्या गळ्यातील दागिने लुटले होते़ या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ अपुरा बंदोबस्त असल्याने महिलांची सुरक्षितता धोक्यात तर आलीच आहे, शिवाय चोर्‍याही वाढल्या आहेत़ बीड जिल्ह्यात एकमेव परळी शहरातून रेल्वे गेलेली आहे़ परळीतील प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरात परराज्यातील भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात़ महत्त्वाचे म्हणजे परळीतील औष्णिक विद्युत केंद्रामुळे येथील रेल्वेस्थानक कायम गजबजलेले असते़ या रेल्वेस्थानकातून आंध्र प्रदेश, कर्नाटकात रेल्वेगाड्या सुटतात़ परळीच्या रेल्वेस्थानकावर आधुनिक सोयी- सुविधा पुरविण्याचे प्रयत्न होत असताना प्रवाशांच्या सुरक्षेबाबत मात्र रेल्वे प्रशासन गांभिर्याने पहावयास तसार नाही, असे दिसते़ स्थानकातील पोलिस चौकीला अवकळा प्राप्त झाली आहे़ चौकीचे प्रभारी सुटीवर आहेत़ अपुर्‍या कर्मचार्‍यांवरच प्रवाशांची सुरक्षा निभावली जाते़ रात्रीच्या वेळी तर स्थानकाला कोणी वाली आहे की नाही, अशी बिकट स्थिती असते़ परळी- परभणी व परळी- उदगीर या रेल्वेगाड्यातून प्रवाशांना जीव मुठीत धरुनच प्रवास करावा लागतो़ रात्री- अपरात्री प्रवासाच्या नावाखाली चोर व दरोडेखोरांचा सर्रास वावर असतो, हे आता लपून राहिलेले नाही़ त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने गांभिर्याने पाहण्याची गरज आहे़ अन्यथा चोर व दरोडेखोरांच्या भीतीने लोक रेल्वे प्रवास करणार नाहीत, असे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष जी़ एस़ सौंदळे यांनी सांगितले़ अतिक्रमणाचा विळखा रेल्वेस्थानक परिसरात अतिक्रमण वाढले आहे़ प्रवेशद्वारावरच फळविक्रेते ठाण मांडून असतात़ ज्यूस सेंटर, आॅटोरिक्षा, दुचाकी वाहने यामुळे रस्ता अपुरा पडत आहे़ अतिक्रमण हटविण्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप व्यापारी गोवर्धन चाटे यांनी केला़ प्रवाशांनी घाबरू नये अपुरा स्टाफ आहे हे मान्य आहे; परंतु प्रवाशांनी घाबरुन जाऊ नय़े़ आवश्यकतेनुसार जादा फौजफाटा तैनात करण्यात येतो, असे शहर ठाण्याचे निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी सांगितले़ रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी परळीपासून परभणीपर्यंत व पुढे बिदरपर्यंत तैनात असतात़ त्यामुळे प्रवाशांनी घाबरुन न जाता सुरक्षितरीत्या प्रवास करावा, असे आवाहन निरीक्षक गायकवाड यांनी केले़

Web Title: Railway passengers question security questionnaire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.