रेल्वे पार्सल सेवाही ठरतेय धोकादायक...!

By Admin | Updated: June 27, 2016 01:04 IST2016-06-27T00:36:58+5:302016-06-27T01:04:01+5:30

औरंगाबाद : कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनवरील पार्सल कार्यालयात कोणतीही तपासणी यंत्रणा नाही.

RAILWAY PARCEL SERVICES DEBATE ...! | रेल्वे पार्सल सेवाही ठरतेय धोकादायक...!

रेल्वे पार्सल सेवाही ठरतेय धोकादायक...!


औरंगाबाद : कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनवरील पार्सल कार्यालयात कोणतीही तपासणी यंत्रणा नाही. याठिकाणीही येणारे पार्सल कोणत्याही तपासणीविना पाठविले त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकात बसमध्ये झालेल्या पार्सलच्या स्फोटाच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका आहे.
मध्यवर्ती बसस्थानकात २१ जून रोजी उभ्या बसमध्ये पार्सल ठेवताना अचानक स्फोट झाल्याची घटना घडली. पार्सलमध्ये स्टेशनरी असल्याचे सांगून केमिकल पाठविण्यात येत होते. त्यातून स्फोटाची घटना घडली. एस. टी. महामंडळाच्या बस पार्सल सेवेत विविध तपासणी यंत्रणेचा, साहित्याचा अभाव आहे. नेमकी हीच परिस्थिती रेल्वेस्टेशनवरील पार्सल कार्यालयातही आहे.
रेल्वेस्टेशनवरील पार्सल कार्यालयात महिन्याला मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी पार्सल पाठविले जातात आणि तेवढेच पार्सल दाखल होतात. पार्सलचे वजन करून पोहोचविण्यात येणाऱ्या ठिकाणापर्यंतचे शुल्क घेतले जाते. पार्सलवरील आतील मालाची नोंद केली जाते; परंतु प्रत्यक्षात पार्सलमध्ये काय आहे, याची पडताळणी करण्याकडे दुर्लक्ष केले जाते.

Web Title: RAILWAY PARCEL SERVICES DEBATE ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.