शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगर ते पुणे 'ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे'लगतच रेल्वेमार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 16:03 IST

छत्रपती संभाजीनगर ते पुणे असा नवा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वेलगत नागपूर ते पुणे रेल्वेमार्ग केला तर नागपूर ते पुणे रेल्वेचे अंतर आणखी १०० किलोमीटरपर्यंत कमी होईल.

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर ते पुणे असा नवा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे होत आहे. त्यालगतच नागपूर ते पुणे लोहमार्ग करता आला तर रेल्वेचे अंतर आणखी १०० किलोमीटरपर्यंत कमी होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात जाहीर केले.

अहिल्यानगर ते पुणे आणि अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर हा संपूर्ण औद्योगिक पट्टा आहे. त्याच्या पलीकडे पुण्याहून तीन लाईन आहेत. त्या पाच लाईन करण्याचे काम सुरू आहे. सोबत जेएनपीटी पोर्ट अशी कनेक्टिव्हिटी करावी. मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्याशी चर्चा झाली आहे. हे झाले तर नवीन माल वाहतूक कॉरिडोर तयार होईल. नागपूर येथे याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, एक अलाइनमेंट तयार केली आहे. त्या अलाइनमेंटची ऑफर रेल्वेला देऊ. भूसंपादन सध्या गती घेणारच आहे. रेल्वे आणि रस्ता हे दोन्ही एकत्रित झाले तर नव्याने एकत्रित भूसंपादनाचा विचार होईल. छत्रपती संभाजीनगर ते पुणे असा नवा एक्स्प्रेस वे होत आहे. त्याच्याच लगत नागपूर ते पुणे रेल्वेमार्ग केला तर नागपूर पुणे रेल्वेचे अंतर आणखी १०० किलोमीटरपर्यंत कमी होईल.

संभ्रम कसा दूर होणार?मुख्यमंत्री संयुक्त अलायनमेंट करून छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा लोहमार्ग एकत्रित करण्याचे सांगत आहेत. दुसरीकडे खा. डॉ. कराड यांनी छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर लोहमार्गाचा डीपीआर झाल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नेमके काय होणार आहे, याबाबत जनसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

रस्ता व लोहमार्ग सोबतचछत्रपती संभाजीनगर ते पुणे या महामार्गाचे काम एमएसआयडीसी करणार आहे. त्याचे भूसंपादन लवकरच होणार आहे. या भूसंपादनातच नागपूर ते पुणे रेल्वेमार्गाचे भूसंपादन झाले तर छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हे अलायनमेंट त्या मार्गावर शिफ्ट होईल.- डॉ. भागवत कराड, खासदार

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRailway Passengerरेल्वे प्रवासीrailwayरेल्वेhighwayमहामार्ग