काँग्रेसचा रेलरोको
By Admin | Updated: June 26, 2014 00:39 IST2014-06-26T00:29:43+5:302014-06-26T00:39:11+5:30
परभणी : केंद्र शासनाने रेल्वेच्या प्रवासी आणि माल वाहतूक दरामध्ये वाढ केल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २५ जून रोजी सचखंड एक्स्प्रेस रोखून धरण्यात आली़
काँग्रेसचा रेलरोको
परभणी : केंद्र शासनाने रेल्वेच्या प्रवासी आणि माल वाहतूक दरामध्ये वाढ केल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २५ जून रोजी सचखंड एक्स्प्रेस रोखून धरण्यात आली़
या रेलरोकोच्या माध्यमातून ही भाडेवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली़ केंद्र शासनाने रेल्वेच्या प्रवासी भाड्यामध्ये १४ टक्के वाढ केली आहे़ महागाईने होरपळणाऱ्या जनतेला केंद्र शासनाने रेल्वे भाडेवाढ करून महागाईच्या खाईत लोटले आहे़ त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी देखील या भाडेवाढीचा विरोध केला़ २५ जून पासून ही भाडेवाढ लागू झाली आहे़ हा मागे घेण्याच्या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी रेलरोको आंदोलन करण्यात आल़े
काँग्रेसच्या रेलरोको आंदोलनासाठी सकाळपासूनच स्थानकावर कार्यकर्ते जमू लागले होते़ सचखंड एक्स्प्रेस रेल्वे स्थानकावर दाखल झाल्यानंतर रेल्वेसमोर ठिय्या मांडून एक तास आंदोलन करण्यात आले़ भाडेवाढीच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या़ तसेच भाडेवाढीचा निर्णय विनाविलंब रद्द करावा व जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली़ एक तास केलेल्या आंदोलनानंतर रेल्वे स्टेशन मास्टर यांना निवेदन सादर करण्यात आले़ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, मनपाचे गटनेते भगवान वाघमारे, इरफान रहेमान खान, बाळासाहेब दुधगावकर, परवेझ खुसरो, पप्पू मोरे, बाळासाहेब देशमुख, बाबासाहेब फुले, भालचंद्र गोरे, मो़ गौस बागवान, राजाभाऊ रणदीपे, सत्तार इनामदार, गफार मास्टर, प्रभाकर जैस्वाल, प्रताप पवार, नागेश सोनपसारे, रविराज देशमुख, अशोकराव शिंदे, बाजीराव माने, रत्नमाला सिंगनकर, प्रा़ संजय जामठीकर, मो़ इलियास, श्रीधर देशमुख आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)
हे आंदोलनाचे यश-देशमुख
केंद्र शासनाने १४़५ टक्के रेल्वे भाडेवाढ केली आहे़ आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात मोठी भाडेवाढ आहे़ अच्छे दिन आयगें अशी घोषणा करणाऱ्या सरकारने रेल्वे भाडेवाढीसह पेट्रोल, डिझेल, भाजीपाल्याची भाववाढ केल्याने बुरे दिन आल्याची भावना निर्माण होत आहे़ मुंबईत लोकल पासचे भाव दुप्पट केले होते, याचा निषेध करीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने तीव्र आंदोलने केली़ त्यामुळे केंद्र शासनाला हा निर्णय अंशत: बदलावा लागला व भाडेवाढीत सवलत देण्यात आली़ ही सवलत म्हणजे काँग्रेसच्या आंदोलनाचेच यश आहे, असे मत जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख, काँग्रेस प्रदेश सचिव बाळासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले़