शहागंजमध्ये राडा

By Admin | Updated: June 5, 2016 00:43 IST2016-06-05T00:16:44+5:302016-06-05T00:43:44+5:30

औरंगाबाद : मुस्लिम बांधवांचा अत्यंत पवित्र असलेल्या रमजान महिन्याला सोमवारपासून सुरुवात होत आहे. दरवर्षी शहागंज परिसरात भाविकांना, वाहनधारकांना अतिक्रमणांचा बराच त्रास सहन करावा लागतो.

Rada in Shahaganj | शहागंजमध्ये राडा

शहागंजमध्ये राडा

औरंगाबाद : मुस्लिम बांधवांचा अत्यंत पवित्र असलेल्या रमजान महिन्याला सोमवारपासून सुरुवात होत आहे. दरवर्षी शहागंज परिसरात भाविकांना, वाहनधारकांना अतिक्रमणांचा बराच त्रास सहन करावा लागतो. महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी शनिवारी सकाळपासून शहागंज भाजीमंडई, जुने एस. टी. बसस्थानक परिसरात जोरदार अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न ‘एमआयएम’च्या काही तथाकथित नेत्यांनी केला.
शनिवारी सकाळी आ. इम्तियाज जलील, मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहागंज परिसराची संयुक्त पाहणी केली. पाहणी दौरा संपताच वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सी. डी. शेवगण, मनपाचे महावीर पाटणी यांनी शहागंज भाजीमंडई परिसरात जोरदार अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. लहान-मोठी सर्वच अतिक्रमणे काढण्याचा सपाटा मनपाने लावला. दुपारपर्यंत तब्बल ४३ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. शहागंज एस. टी. बसस्थानकाजवळील तब्बल १५ लहान मोठ्या लोखंडी टपऱ्या, अतिक्रमणे काढण्यात आली. दुपारी ४.३० वाजता ‘एमआयएम’मधून हकालपट्टी करण्यात आलेले तथाकथित नेते जावेद कुरैशी, एमआयएमचे नगरसेवक जमीर कादरी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या कारवाईला कडाडून विरोध केला. जावेद कुरैशी निघून गेल्यावर हळूहळू कारवाई सुरूच ठेवली. सायंकाळी कुरैशी जमाव घेऊन आले.
अतिक्रमणाच्या मुद्यावर शहागंजात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना या भागातील नगरसेवक फिरोज खान घटनास्थळावर आले. त्यांनी मनपाचे प्रशासकीय अधिकारी अजमत खान यांना धारेवर धरले. ही कारवाई उपायुक्त रवींद्र निकम, बोईनवाड, आर.एस. राचतवार, सय्यद जमशीद आदींनी केली.

Web Title: Rada in Shahaganj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.