शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

रबी हंगाम रोगराईच्या विळख्यात !

By admin | Updated: January 5, 2015 00:36 IST

उमरगा : तालुक्यात चार-पाच दिवसांपासून वातवरणामध्ये सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे रबीच्या पिकांना फटका बसत असून सुमारे ३५ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत.

उमरगा : तालुक्यात चार-पाच दिवसांपासून वातवरणामध्ये सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे रबीच्या पिकांना फटका बसत असून सुमारे ३५ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत.अख्ख्या पावसाळ्यात तालुक्यात सरासरीच्या अवघा ४४९ मिमी पाऊस झाला. अवेळी झालेल्या पावसामुळे खरीप हंगामही शेतकऱ्याच्या हातचा गेला. अत्यल्प पावसावर सुमारे ३५ हजार हेक्टरवर पेरणी केली. यापैकी १२ हजार हेक्टरवर रबी ज्वारी तर १३ हजार हेक्टरवर हरभऱ्याचे पीक आहे. उर्वरित क्षेत्रात करडई, गहू आदी पिके आहेत. असे असतानाच मागील चार-पाच दिवसांपासून वातावरणामध्ये होत असलेल्या बदलांमुळे पिकांवर आता विविध प्रकारच्या रोगराईचा प्रादुर्भाव होवू लागला आहे. (वार्ताहर)करडईचे पीक सद्या फुलोऱ्यात आहे. याही पिकावर आता मावा रोग पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पिकाची अपेक्षित वाढ होत नसल्याचे शेतकरी सांगतात. त्याचप्रमाणे काही भागात फुलोऱ्यात आलेल्या करडईची फुले गळू लागली आहेत.आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण, अधूनमधून पडणारा रिमझिम पाऊस व हवामानातील कमी झालेली उष्णता या एकूणच परिस्थितीचा ज्वारी, गहू, हरभरा, करडई या पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. ज्वारी पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगामुळे ज्वारीची पाने पिवळी पडून वाढ खुंटण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीवर १० लिटर पाण्यात १० मिली रोगर व २ टक्के युरीयाची फवारणी करणे आवश्यक झाले आहे. तसेच हरभऱ्यावर पडणाऱ्या घाटे अळीच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात इकॅलॅक्स २५ मिली व ५ टक्के लिंबुळी आर्क अशी फवारणी करावी. करडई पिकावरील मावा व इतर कीड नियंत्रणासाठी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वेळोवेळी फवारण्या कराव्यात, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी हणमंत गोरे यांनी केले आहे.ज्वारीवर ‘मावा’तालुक्यातील मुरुम, आलूर, अचलेर, नारंगवाडी, मुळज, तुरोरी या भागातील शेतकऱ्यांनी प्राधान्याने रबी ज्वारीच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात केल्या आहेत. विंधन विहिरी व साठवण तलावातील उपलब्ध पाण्यावर ज्वारी जोपासली जात असली तरी पाच दिवसांपासून हवामानात बदल झाल्याने ढगाळ वातावरणात धुई पडून पिकांवर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. हरभरा पिकावर ‘घाटे अळी’उशिराने पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा ज्वारीपेक्षाही जास्त म्हणजेच तब्बल १३ हजार हेक्टवर हरभऱ्याची पेरणी केली. या पिकाची बऱ्यापैकी वाढ झालेली असतानाच ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.