बोरीजवळ धावत्या जीपला लागली आग

By Admin | Updated: December 17, 2015 23:59 IST2015-12-17T23:52:06+5:302015-12-17T23:59:10+5:30

बोरी : परभणी- जिंतूर महामार्गावर बोरी गावाजवळ धावत्या जीपला आग लागल्याने जीप जळून खाक झाली़ १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली़

A quick jeep near the sack took fire | बोरीजवळ धावत्या जीपला लागली आग

बोरीजवळ धावत्या जीपला लागली आग

बोरी : परभणी- जिंतूर महामार्गावर बोरी गावाजवळ धावत्या जीपला आग लागल्याने जीप जळून खाक झाली़ १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली़
बोरी येथील वैजनाथ भोंबे हे एमएच २२ व्ही ३८३ या क्रमांकाची जीप घेऊन जिंतूरहून बोरी येथे येत होते़ बोरीजवळ जीप आल्यानंतर जीपला आग लागल्याची माहिती भोंबे यांना समजली़ त्यांनी तातडीने घरच्या मंडळींना जीपमधून खाली उतरविले व स्वत:ही उडी मारली़ काही वेळातच जीपने मोठा पेट घेतला आणि अर्ध्या तासात संपूर्ण जीप जळून खाक झाली़
या घटनेमुळे एक तास वाहतूक ठप्प राहिली़ दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी रेणुका वागळे, यु़ जी़ शेख यांनी घटनास्थळास भेट दिली़ (प्रतिनिधी)

Web Title: A quick jeep near the sack took fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.