सोशल मीडियातून अफवा अन् छत्रपती संभाजीनगरात पुन्हा पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 04:22 PM2024-01-08T16:22:36+5:302024-01-08T16:23:09+5:30

अफवेमुळे पंपावर वाहनधारकांची गर्दी होत असून इंधनाची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची परिस्थिति

Queue of motorists at petrol pumps in Chhatrapati Sambhajinagar due to rumours | सोशल मीडियातून अफवा अन् छत्रपती संभाजीनगरात पुन्हा पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा

सोशल मीडियातून अफवा अन् छत्रपती संभाजीनगरात पुन्हा पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा

छत्रपती संभाजीनगर: 'हीट अँड रन' कायद्याच्या विरोधात  टँकर चालक पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याच्या अफवेने शहरात पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र, पेट्रोलियम डिलर संघटनेचे शहराध्यक्ष अखिल अब्बास यांनी स्पष्टीकरण दिले असून पेट्रोल- डिझेलचे टँकर चालक संपावर जाणार याबाबत कोणतीही माहिती चालकांच्या संघटनेने दिलेली नाही. यामुळे पंपावर गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे.  

सोशल मिडियातून पसरली अफवा
ट्रक चालक संपावर जाणार असल्याने पेट्रोल पंप बंद असतील अशा आशयाची अफवा सोशल मिडियातून शहरात पसरली. यामुळे काही वेळातच शहरातील सर्व पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी केली. चार दिवस पेट्रोल पंप बंद राहतील, असे सोशल मिडियातून कळल्याचे काही वाहनधारक पंपावर सांगत होते. 

.. तर कृत्रिम टंचाई निर्माण होईल 
पेट्रोल- डिझेलची वाहतूक करणारे टँकर चालक संपावर जाणार याबाबत त्यांच्या संघटनांनी काहीच जाहीर केलेले नाही. यामुळे शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अफवेमुळे पंपावर गर्दी होत आहे. यामुळे इंधनाची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते. कोणीही अफवेस बळी पडू नये. 
- अखिल अब्बास, अध्यक्ष, पेट्रोलियम डिलर संघटना  

Web Title: Queue of motorists at petrol pumps in Chhatrapati Sambhajinagar due to rumours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.