- सुनील घोडकेखुलताबाद (छत्रपती संभाजीनगर): सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कंगणा राणावत यांनी आज शुक्रवारी ( दि. २६) दुपारी बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. आपल्या भावासोबत आलेल्या कंगणा यांनी पूर्ण विधीवत अभिषेक आणि महापूजा केली. नाताळच्या सुट्ट्यांमुळे मंदिरात आधीच मोठी गर्दी असताना कंगणा यांच्या येण्याने मंदिर परिसरात चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
१२ ज्योतिर्लिंगांची यात्रा आणि भक्ती कंगणा राणावत यांनी सध्या देशातील १२ ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचा संकल्प केला आहे. या यात्रेचाच एक भाग म्हणून आज दुपारी सव्वादोनच्या सुमारा त्या वेरूळात दाखल झाल्या. मुख्य पुजारी परेश पाठक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कंगणा यांनी महादेवाचा जलाभिषेक केला. गाभाऱ्यातील शांतता आणि भक्तिमय वातावरणात त्या काही वेळ तल्लीन झाल्या होत्या.
सेल्फीसाठी चाहत्यांची झुंबड कंगणा राणावत मंदिरात आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सुट्ट्यांमुळे मंदिर परिसरात पर्यटकांची मोठी संख्या होती. आपल्या आवडत्या अभिनेत्रीला पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत गर्दीवर नियंत्रण मिळवले.
देवस्थानच्या वतीने सत्कारदर्शन झाल्यानंतर घृष्णेश्वर मंदिर देवस्थानच्या वतीने विश्वस्त राजेंद्र कौशीके यांच्या हस्ते कंगणा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कुणाल दांडगे, कार्यकारी विश्वस्त योगेश टोपरे, संजय वैद्य, मिलींद शेवाळे, उमेश शास्त्री यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. भक्ती आणि उत्साहाच्या या वातावरणात कंगणा यांनी शिवदर्शन घेऊन आपली पुढची यात्रा सुरू केली.
Web Summary : Actress Kangana Ranaut visited the Grishneshwar temple, one of the twelve Jyotirlingas, as part of her pilgrimage. She performed rituals and received a warm welcome amidst enthusiastic crowds. Ranaut is on a journey to visit all twelve Jyotirlingas.
Web Summary : अभिनेत्री कंगना रनौत ने अपनी तीर्थयात्रा के भाग के रूप में बारह ज्योतिर्लिंगों में से एक, घृष्णेश्वर मंदिर का दौरा किया। उन्होंने अनुष्ठान किए और उत्साही भीड़ के बीच उनका गर्मजोशी से स्वागत किया गया। रनौत सभी बारह ज्योतिर्लिंगों की यात्रा पर हैं।