‘गुणवत्ता कोणा एकाची मक्तेदारी ठरत नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:59 IST2018-07-06T23:58:43+5:302018-07-06T23:59:12+5:30

बीड गुणवत्ता ही कुठल्या एका जातीची मक्तेदारी नाही, कर्तृत्व दाखवणे हे विद्यार्थ्यांच्या हातात आहे. समाजाला हिणवण्याचे दिवस गेले, आरक्षण व आरक्षणाच्या कुबड्या भविष्यकाळात पुरेशा नाहीत. त्यामुळे पारंपरिक व्यवसायापेक्षा लेखणीची परंपरा हाती घ्या, असे प्रतिपादन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

'Quality does not belong to anyone's monopoly' | ‘गुणवत्ता कोणा एकाची मक्तेदारी ठरत नाही’

‘गुणवत्ता कोणा एकाची मक्तेदारी ठरत नाही’

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : गुणवंतांचा कौतुक सोहळा; मान्यवरांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड गुणवत्ता ही कुठल्या एका जातीची मक्तेदारी नाही, कर्तृत्व दाखवणे हे विद्यार्थ्यांच्या हातात आहे. समाजाला हिणवण्याचे दिवस गेले, आरक्षण व आरक्षणाच्या कुबड्या भविष्यकाळात पुरेशा नाहीत. त्यामुळे पारंपरिक व्यवसायापेक्षा लेखणीची परंपरा हाती घ्या, असे प्रतिपादन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
शहरातील माजलगावकर मठ येथे जय संताजी प्रतिष्ठानच्या वतीने तेली समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ तैलिक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. व्यासपीठावर मन्मथ हेरकर, दिलीप गोरे, बबनराव गोरे, अ‍ॅड.शेख शफिक, शाहेद पटेल, दिनेश परदेशी, दत्तात्रय सोनटक्के, राजाराम बन्सोडे व प्रतिष्ठानचे शिवलिंंग क्षीरसागर आदी उपस्थित होते.
प्रतिष्ठानच्या वतीने तसेच माजलगाव, वडवणी, बीड, शिरूर, पाटोदा, परळी व अंबाजोगाई येथील तेली समाजबांधवांनी आ. जयदत्त क्षीरसागर यांचे स्वागत केले. या कार्यक्रमात आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते १७५ गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
संत जगनाडे महाराज यांचे मंदिर उभारण्यासाठी आपण जागा उपलब्ध करून दिली असून, स्थानिक निधीतून १० लाख रूपये देऊन लवकरच सभामंडपाचे कामही सुरू होईल, असे आ. क्षीरसागर यावेळी म्हणाले.
प्रास्ताविक शिवलिंंग क्षीरसागर यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा.श्रीराम जाधव यांनी केले.
जनगणना : गरजेची
४ यावेळी बोलताना आ.जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, आरक्षण हे जातनिहाय असले तरी नव्याने जनगणना करून ओबीसीच्या आरक्षणात बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे जनगणना होणे ही काळाची गरज बनली आहे.

Web Title: 'Quality does not belong to anyone's monopoly'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.