पोळा सणासाठी मोजक्या साहित्याचीच खरेदी
By Admin | Updated: August 25, 2014 01:37 IST2014-08-25T01:14:50+5:302014-08-25T01:37:04+5:30
उस्मानाबाद :पावसाळा संपत आला तरी अपेक्षित पाऊस पडला नाही याचा परिणाम शेती उद्योगावर झाला आहे. दरवर्षी पोळा सण हा उत्साहात साजरा करण्यात येत असतो.

पोळा सणासाठी मोजक्या साहित्याचीच खरेदी
उस्मानाबाद :पावसाळा संपत आला तरी अपेक्षित पाऊस पडला नाही याचा परिणाम शेती उद्योगावर झाला आहे. दरवर्षी पोळा सण हा उत्साहात साजरा करण्यात येत असतो. यंदा पोळा सणावर जेमतेम खर्च करून सण साजरा करणार असल्याचे भूम तालुक्यातील सावरगाव (दे़) येथील शेतकरी बापूराव मस्के यांनी सांगितले़साजरा करणार
यंदा दुष्काळग्रस्त परिस्थिती असून त्यात मध्यंतरी झालेली गारपीट झाली़ अल्प पाऊस, उशिराने झालेली खरिपाची पेरणी यामुळे पोळा सणावर दुष्काळाचे सावट आहे़ त्यामुळे हा सण साधे पणाने साजरा करण्याची वेळ आल्याचे चिंचोली (ता़भूम) येथील शेतकरी शेषेराव वारे यांनी सांगितले़
गत काही वर्षापासून दुष्काळी स्थितीमुळे पोळा सणानिमित्त लागणाऱ्या साहित्याची कमी प्रमाणात विक्री होत आहे़ यंदाही पावसाच्या लहरीपणामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे पोळ्याच्या साहित्याची कमी प्रमाणात विक्री झाल्याचे भूम येथील व्यापारी बालाजी माळी यांनी सांगितले़
पाऊस वेळेवर पडत नसल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे़ तरीही पोळा सण हा शेतकरी साजरा करतात़ मात्र, यंदा वाढती महागाई, गारपीट, पावसाने दिलेली ओढ यामुळे सणावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे़ त्यामुळे अनेकांनी पुजेला लागणारे साहित्य खरेदी करण्यावर भर दिल्याचे उमरगा येथील व्यापारी राम अटुरे-सूर्यवंशी यांनी सांगितले़