शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

औरंगाबादेत डस्टबिन खरेदीपूर्वीच घोटाळा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 1:10 AM

शहरात कच-याचा प्रश्न गंभीर बनलेला असताना मनपा अधिका-यांना त्यातही खाबूगिरीचे अनेक मार्ग सापडत आहेत.

ठळक मुद्देकचऱ्यातही खाबूगिरी : दोषी अधिका-यांना अभय

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात कच-याचा प्रश्न गंभीर बनलेला असताना मनपा अधिका-यांना त्यातही खाबूगिरीचे अनेक मार्ग सापडत आहेत. डस्टबिन खरेदीत मनपाला कोट्यवधींचा चुना लावण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. बाजारात १०० रुपयांमध्ये भेटणारे डस्टबिन चक्क मनपा अधिका-यांनी १६६ रुपयांमध्ये खरेदी करण्याचे निश्चित करून टाकले. ही संभाव्य खरेदी रद्द करून निविदा पद्धतीने बाजारातून डस्टबिन खरेदीचा निर्णय महापौरांनी घेतला.स्मार्ट सिटी योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाने महापालिकेला तब्बल २९१ कोटी रुपये अदा केले आहेत. या निधीतील १० कोटी रुपये घनकचरा व्यवस्थापनावर खर्च करण्याची मुभा स्मार्ट सिटी संचालक मंडळाने दोन महिन्यांपूर्वीच दिली. या निधीतून रिक्षा खरेदी, डस्टबिन खरेदी करण्यात येणार होते. महापालिकेच्या यांत्रिकी विभागाने कोट्यवधी रुपयांचे डस्टबिन खरेदी करण्यासाठी शासनाच्या जे.एम. पोर्टलची मदत घेतली. पोर्टलवर उपलब्ध कंपन्यांनी वेगवेगळे दर डस्टबिनसाठी दर्शविले आहेत. १२ लिटरचे डस्टबीन १६६ रुपयांमध्ये दर्शविले आहे. मनपा अधिकाºयांनी हे दरही निश्चित करून फाईल मंजुरीसाठी प्रस्ताव सुरू केला. मंगळवारी महापौरांच्या आढावा बैठकीत डस्टबिन खरेदीचा मुद्दा समोर येताच अधिकाºयांनी छातीठोकपणे सर्व माहिती देण्यास सुरुवात केली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी त्वरित एका खाजगी विक्रेत्याला बैठकीत बोलावून घेतले. हा विक्रेता चक्क दोन डस्टबिन घेऊनच बैठकीत आला. महापौरांनी डस्टबिन दाखविताना सांगितले की, १७ लिटरचेउच्च दर्जाचे डस्टबिन बाजारात १०० रुपयांमध्ये मिळत आहे. महापालिका १२ लिटरचे डस्टबिन थेट १६६ रुपयांमध्ये खरेदी करतेय म्हणजे नवलच म्हणावे लागेल, असे महापौरांनी नमूद केले.साडेतीन कोटींच्या उधळपट्टीला ब्रेकमनपाच्या यांत्रिकी विभागाने कचरा उचलण्यासाठी हुकलोडर व इतर वाहने खरेदीसाठी कारवाई सुरू केली. साडेतीन कोटी रुपयांची ही सर्व खरेदी असल्याचे सांगण्यात आले. राज्य शासनाने दोन आठवड्यांपूर्वीच घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी मनपाला ८० कोटी रुपये देण्याचे मान्य केले. यामध्ये १० कोटी रुपयांची वाहनेही खरेदी करण्याची मुभा आहे. असे असताना मनपाच्या तिजोरीतून साडेतीन कोटी रुपयांची उधळपट्टी कशासाठी करण्यात येत असल्याचा जाब महापौरांनी विचारला. त्यावर अधिकाºयांनी आम्हाला यासंदर्भात माहितीच नसल्याचे सांगून आपली सुटका करून घेतली.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादCorruptionभ्रष्टाचार