पुंजाराम पाठे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:08 IST2021-01-08T04:08:37+5:302021-01-08T04:08:37+5:30

वाळूज महानगर : वाळूज येथील प्रतिष्ठित नागरिक पुंजाराम विश्वनाथ पाठे (७०) यांचे सोमवारी (दि.४) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर ...

Punjaram Pathe passed away | पुंजाराम पाठे यांचे निधन

पुंजाराम पाठे यांचे निधन

वाळूज महानगर : वाळूज येथील प्रतिष्ठित नागरिक पुंजाराम विश्वनाथ पाठे (७०) यांचे सोमवारी (दि.४) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी पखोरा ता.गंगापूर येथील मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. बांधकाम व्यावसायिक लक्ष्मण पाठे व बंडू पाठे यांचे ते वडील तर वाळूज ग्रामपंचायत सदस्या मिना पाठे यांचे ते सासरे होत.

फोटो क्रमांक- पुंजाराम पाठे (मयत)

-------------------------

रांजणगावातून महिला बेपत्ता

वाळूज महानगर : रांजणगावातून एक २२ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे. आरती सुनील मोटे (२२ रा.एकतानगर, रांजणगाव) ही महिला सोमवार (दि.४) सायंकाळी घरातून निघून गेली आहे. सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून न आल्याने तिचे पती सुनील मोटे यांनी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे.

फोटो क्रमांक-आरती मोटे (बेपत्ता)

-----------------------

बकवालनगरातून व्यक्ती बेपत्ता

वाळूज महानगर : बकवालनगरातून एक ३५ वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची तक्रार वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

विनोद भिमराव बनकर याचे आई-वडील २१ डिसेंबरला गावी गेल्यानंतर विनोद हा घरात एकटाच होता. सायंकाळी घरी परतल्यावर आई-वडिलांना विनोद हा घरात दिसून न आल्याने त्यांनी परिसरात सर्वत्र त्याचा शोध घेतला. मात्र विनोद हा कुठेही मिळून न आल्याने त्याचे वडील भिमराव बनकर यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे.

---------------------

Web Title: Punjaram Pathe passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.