खड्ड्यांसाठी आता पुणे पॅटर्न

By Admin | Updated: July 23, 2016 01:10 IST2016-07-23T00:20:05+5:302016-07-23T01:10:29+5:30

औरंगाबाद : पुणे महापालिकेने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी आणि विविध डागडुजीच्या कामांसाठी अत्याधुनिक व्हॅन तयार केली आहे.

Pune pattern now for the pits | खड्ड्यांसाठी आता पुणे पॅटर्न

खड्ड्यांसाठी आता पुणे पॅटर्न

औरंगाबाद : पुणे महापालिकेने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी आणि विविध डागडुजीच्या कामांसाठी अत्याधुनिक व्हॅन तयार केली आहे. यामध्ये खड्डे बुजविण्यासाठी सर्व अत्यावश्यक सामुग्री आहे. शिवाय दुभाजकांची जाळी तुटलेली असेल तर लहान वेल्ंिडग मशीनच्या साह्याने ती दुरुस्त करता येते. अपघात टाळण्यासाठी कॅट आईज नसतील तर तेथे पटकन कॅट आईज बसविता येतील, असाच प्रयोग औरंगाबाद शहरात करता येऊ शकतो का, यादृष्टीने महापालिका प्रशासनाने चाचपणी सुरू केली आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर हजारो नव्हे तर लाखोंच्या संख्येने खड्डे पडले आहेत. महापालिकेतील राजकीय मंडळींनी नागरिकांना तूर्त दिलासा देण्याऐवजी उलट प्रशासनाला कशा पद्धतीने कात्रित पकडता येईल, यादृष्टीने डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. शहरातील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाने ३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. कंत्राटदारांमार्फत हे काम करून घेण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. डांबर प्लँटच्या उभारणीसाठी बराच वेळ लागेल तेव्हापर्यंत औरंगाबादकरांनी काय करावे याचा विचार कोणीच केला नाही. बराच वाद-विवाद झाल्यानंतर मनपाने सध्या खड्ड्यांमध्ये खडी आणि मुरूम टाकण्यास सुरुवात केली आहे. एकाच पावसात मुरूम, खडी वाहून जाणार हे प्रशासनालाही माहीत आहे.

Web Title: Pune pattern now for the pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.