थोडक्यात बचावला पंप..!

By Admin | Updated: March 28, 2015 00:45 IST2015-03-28T00:22:20+5:302015-03-28T00:45:11+5:30

उस्मानाबाद : आगीची घटना घडल्यानंतर अग्नीशमन दलाची गाडी नेहमीच उशिराने येते, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र, शुक्रवारी दुपारी अग्नीशमन दलाची गाडी वेळेवर पोहोचली.

Pump run briefly ..! | थोडक्यात बचावला पंप..!

थोडक्यात बचावला पंप..!


उस्मानाबाद : आगीची घटना घडल्यानंतर अग्नीशमन दलाची गाडी नेहमीच उशिराने येते, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र, शुक्रवारी दुपारी अग्नीशमन दलाची गाडी वेळेवर पोहोचली. हे पथक येण्यास काही मिनिटांचा विलंब झाला असता तर संपूर्ण पेट्रोलपंप आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असता.
शहरानजीक एमआयडीसी परिसरात ‘समृद्धी पेट्रोलियम’च्या स्टोअररूमला शुक्रवारी दुपारी ४़४५ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली़ या स्टोअर रूममध्ये आॅईलचे रिकामे डबे ठेवण्यात आले होते. आगीमुळे आॅईलने पेट घेतला आणि पाहता पाहता संपूर्ण स्टोअर रूम आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीत स्टोअरमधील एका बुलटसह, आॅईल डबे, कागदपत्रे व इतर साहित्य जळून खाक झाले़ आगीमुळे रिकाम्या डब्यातील आॅईल वितळून ते पंपाच्या दिशेने वाहू लागले. त्यामुळे मोठा अनर्थ होण्याची स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी पंपाच्या शेजारील परिसर निर्मनुष्य केला होता. आग पेट्रोलपंपाच्या दिशेने जात असतानाच पालिकेच्या अग्नीमशन दलाची गाडी तेथे पोहोचली आणि पंपाच्या दिशेने जात असलेले आगीचे लोट थांबविण्यात त्यांना यश आले. ही गाडी काही सेकंद उशिराने आली असती तर परिसरात मोठा अनर्थ ओढवला असता.
घटनेची माहिती मिळताच पेट्रोल पंपाचे संचालक दत्ता कुलकर्णी, बालाजी कोरे यांच्यासह शहरातील अनेक नागरिकांनी पेट्रोल पंप परिसरात गर्दी केली होती़ शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले़ अग्निशमन दलाचे प्रमुख झेड़एच़अन्सारी, फारूख शेख, कुमार तांबे, अल्लाउद्दीन शेख, बाळू खरात, दत्ता बनसोडे यांनी आग अटोक्यात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले़ दरम्यान, महामार्गालगत झालेल्या या घटनेमुळे सुमारे दीड तास या परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Pump run briefly ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.