काँग्रेसच्या संकल्पनामाचे सोमवारी प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:11 IST2017-09-30T00:11:10+5:302017-09-30T00:11:10+5:30
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व पीआरपी आघाडीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संकल्पनामाचे प्रकाशन सोमवारी करण्यात येणार आहे़ यावेळी बुद्धिमंतांशी संवाद साधण्यात येणार आहे़

काँग्रेसच्या संकल्पनामाचे सोमवारी प्रकाशन
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व पीआरपी आघाडीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संकल्पनामाचे प्रकाशन सोमवारी करण्यात येणार आहे़ यावेळी बुद्धिमंतांशी संवाद साधण्यात येणार आहे़
२ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात हा कार्यक्रम होणार आहे़ अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोकराव चव्हाण हे राहणार आहेत़ ज्येष्ठ विचारवंत व माजी खा़ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते संकल्पनामाचे प्रकाशन करण्यात येणार आहे़ यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, आ़डी़पी़सावंत, आ़अमिता चव्हाण, आ़वसंतराव चव्हाण, जि़प़अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांची उपस्थिती राहणार आहे़
कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन काँग्रेस कमिटीचे महानगराध्यक्ष आ़अमरनाथ राजूरकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष बापूराव गजभारे, महापौर शैलजा स्वामी, उपमहापौर शफी अहमद कुरेशी, सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी केले आहे़