यशवंत देशमुख लिखित चार पुस्तकांचा प्रकाशन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:07 IST2021-02-06T04:07:39+5:302021-02-06T04:07:39+5:30
रात्र फार बांधून ठेवते, गाजराची पुंगी, कास्ट नो बार व आयडिया के बारा आणे अशी चार पुस्तके यशवंत देशमुख ...

यशवंत देशमुख लिखित चार पुस्तकांचा प्रकाशन सोहळा
रात्र फार बांधून ठेवते, गाजराची पुंगी, कास्ट नो बार व आयडिया के बारा आणे अशी चार पुस्तके यशवंत देशमुख यांनी लिहिली असून, त्यातील कास्ट नो बार व नाईट बाईड्स या अरविंद कुलकर्णी यांनी इंग्रजीत अनुवादित केली आहेत.
एमजीएमच्या विनोबा भावे सभागृहात झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात प्रख्यात ग्रामीण साहित्यिक प्राचार्य रा रं बोराडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख दासू वैद्य, डॉक्टर मुस्तजिब खान यांनी आपले विचार मांडले.
गाजराच्या पुंगीतील यशवंत देशमुख यांचे सहकारी कलाकार प्रा. डॉ. दिलीप घारे यांनी आठवणींना उजाळा दिला. नाटक सांगण्यापेक्षा म्हणणे सादर करण्याची कला आहे.आणि ही कला यशवंत देशमुख यांच्या लेखणीत ओतप्रोत भरली आहे असे उद्गार डॉ.घारे यांनी काढले. प्रारंभी इलाही जमादार,मानवेंद्र काचोळे व डॉ.शशिकांत बऱ्हाणपूरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.