शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan out of T20 World Cup : पाऊस आला धावून, पाकिस्तान गेला वाहून! अमेरिका Super 8 मध्ये, रचला इतिहास
2
'शरद पवार माझे आवडते नेते, माझं काम त्यांनी तीन मिनीटांत केलं होतं'; अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा
3
अमित शहांनी सुरक्षा अधिकाऱ्यांची घेतली बैठक; जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा घेतला आढावा
4
Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन ठरलं! अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार, किती दिवस चालणार?
5
मोठी बातमी! अमोल किर्तीकर यांना सीसीटीव्ही फूटेज देण्यास उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार
6
इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले स्वागत, पाहा व्हिडीओ
7
अजय जडेजानं वन डे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानला मार्गदर्शन करण्यासाठी एकही रुपया घेतला नाही
8
“छगन भुजबळांनी बंड पुकारून आपले बळ दाखवावे, विधानसभेत धडा शिकवावा”: विजय वडेट्टीवार
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: वाह ‘गुरु’! मातीचे सोने करण्याची शक्ती असलेला ग्रह; चंद्राशी ‘युती’ म्हणजे ‘राजयोग’च
10
Maharashtra Politics : 'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं
11
“आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार”; जयंत पाटील यांनी दिली गॅरंटी!
12
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'
13
अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार
14
“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार
15
ICC ने जाहीर केलं टीम इंडियाचं Super 8 चं वेळापत्रक; जाणून घ्या कधी, केव्हा व कोणाला भिडणार
16
सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले
17
Photos: तुम हुस्न परी... डिझायनर ड्रेस, फॅशनेबल गॉगल; अवनीत कौरचं 'ग्लॅमरस' फोटोशूट
18
या पेनी स्टॉकच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, किंमत ₹5 पेक्षाही कमी, एकाच महिन्यात दिला 55% परतावा!
19
RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले...
20
'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या

निळवंडे प्रकल्पासाठी शिर्डी संस्थानच्या निधीबाबतच्या जनहित याचिकेवर आता ७ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 11:17 PM

शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी देऊ केल्याबाबत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. दैनंदिन खर्च वगळता इतर कोणत्याही कामासाठी संस्थानचा निधी ४ फेब्रुवारीपर्यंत वापरू नये, असा अंतरिम आदेश खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. आर.जी. अवचट यांनी दिला होता. सोमवारी (दि.४) याचिका सुनावणीस निघाली असता पुढील सुनावणी ७ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली.

ठळक मुद्दे मंदिरालगतचे उपविभागीय अधिकाऱ्यांचे कार्यालय इतरत्र हलविण्यासंबंधी खंडपीठाची तोंडी विचारणा

औरंगाबाद : शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी देऊ केल्याबाबत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. दैनंदिन खर्च वगळता इतर कोणत्याही कामासाठी संस्थानचा निधी ४ फेब्रुवारीपर्यंत वापरू नये, असा अंतरिम आदेश खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. आर.जी. अवचट यांनी दिला होता. सोमवारी (दि.४) याचिका सुनावणीस निघाली असता पुढील सुनावणी ७ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली.श्री साई मंदिरालगत असलेल्या उपविभागीय अधिकाºयांच्या कार्यालयावर नागरिकांचे मोर्चे येतात. त्यामुळे मंदिर परिसरातील शांतता भंग पावते. शिवाय कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हे कार्यालय इतरत्र हलविण्यासंबंधी खंडपीठाने तोंडी विचारणा केली. तसेच शिर्डी नगर परिषदेला संस्थानतर्फे स्वच्छतेसाठी निधी दिला जातो. मात्र, शिर्डीत देशातील इतर धार्मिक स्थळांइतकी स्वच्छता नसल्याची टिप्पणी खंडपीठाने केली.यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी ५०० कोटींचा निधी कोणत्या तरतुदीनुसार जाहीर केला, अशी विचारणा केली होती. स्वच्छतेसाठी शिर्डी संस्थान प्रतिवर्षी नगर परिषदेला ४२ लाख ४९ हजार ५९९ रुपये डिसेंबर २०१७ पासून देत असल्याचे अ‍ॅड. नितीन भवर यांनी सांगितले. शिर्डी नगर परिषदेच्या वतीने दिवाणी अर्ज दाखल करण्यात आला. साईबाबांचे भक्त संपूर्ण देशातून आणि परदेशातूनही दर्शनासाठी येतात. देशातील इतर धार्मिक स्थळांप्रमाणे शिर्डीत स्वच्छता का नाही, अशीही विचारणा खंडपीठाने यापूर्वीही केली होती. स्वच्छतेसंबंधीचा निधी नियमित कामकाजाचा भाग असल्याने खंडपीठाने त्यासंबंधी निर्बंध घातले नाही. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर यांनी संस्थानकडे जमा होणारा पैसा हा भाविकांचा आहे, तो धार्मिक कार्यासाठीच खर्च केला गेला पाहिजे, असे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले, तर राज्य शासनाच्या वतीने सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बाजू मांडली. शिर्डी नगरपालिकेतर्फे अ‍ॅड. आश्विन होण आणि हस्तक्षेपक वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्यातर्फे अ‍ॅड. सुरेश कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयAurangabadऔरंगाबादshirdiशिर्डी