मांगीरबाबा यात्रेतील अनिष्ट परंपरेबाबत नागरिकांत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 18:58 IST2019-01-17T18:58:11+5:302019-01-17T18:58:30+5:30
मांगीरबाबा यात्रेत सुरू असलेल्या अनिष्ट व क्रूर प्रथेबाबत चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांमध्ये पत्रके, बॅनर व होर्डिंग्जच्या माध्यमातून जनाजगृती करण्यात येत आहे.

मांगीरबाबा यात्रेतील अनिष्ट परंपरेबाबत नागरिकांत जनजागृती
शेंद्रा : येथे मांगीरबाबा यात्रेत सुरू असलेल्या अनिष्ट व क्रूर प्रथेबाबत चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांमध्ये पत्रके, बॅनर व होर्डिंग्जच्या माध्यमातून जनाजगृती करण्यात येत आहे.
दरवर्षी मांगीरबाबा यात्रेच्या वेळी अंधश्रद्धेपोटी आपले नवस फेडण्यासाठी गळ टोचणे, हजारोंच्या संख्येत बकरे, कोंबड्यांचा बळी देण्याची प्रथा आहे. कायद्यानुसार हे प्र्रकार करणे गुन्हा आहे. याबाबत चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या वतीने गावात बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली. सदर कायद्याबाबत ग्रामस्थांना अवगत करण्यात आले. पोलीस प्रशासन, महसूल विभाग, मांगीरबाबा देवस्थान समिती, शेंद्रा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती करून नागरिकांना अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले. मंदिरासह इतर महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर व होर्डिंग्ज लावण्यात आले.
याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाल, पोलीस उपनिरीक्षक अंतरप, फौजदार देशमुख, पोलीस नाईक सुनील गोरे, मंडळ अधिकरी अनिल सूर्यवंशी, तलाठी स्वप्नील शेळके, सरपंच शुभांगी तांबे, उपसरपंच पुंडलिक कचकुरे, ग्रामसेवक हरिदास पाथ्रे, देवस्थान समितीचे अध्यक्ष भास्कर कचकुरे, सचिव व तंटामुक्त अध्यक्ष सुरेश नाईकवाडे, अशोक कचकुरे, सोमनाथ कचकुरे, किशोर शेजूळ, रवींद्र तांबे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.