तरतूद ‘१०४’ ची; मिळाले ३० कोटी

By Admin | Updated: January 28, 2015 00:55 IST2015-01-28T00:46:03+5:302015-01-28T00:55:23+5:30

गंगाराम आढाव , जालना राज्यातील महामंडळांना केंद्रीय अर्थ सहाय्य निधी अंतर्गत १०४ कोटी ४२ लाखांची तरतूद करण्यात होती. त्या पैकी पहिला हप्ता म्हणून ३० कोटी लाखाचा निधी वितरण करण्यास राज्य

Provision of '104'; Given 30 Crore | तरतूद ‘१०४’ ची; मिळाले ३० कोटी

तरतूद ‘१०४’ ची; मिळाले ३० कोटी



गंगाराम आढाव , जालना
राज्यातील महामंडळांना केंद्रीय अर्थ सहाय्य निधी अंतर्गत १०४ कोटी ४२ लाखांची तरतूद करण्यात होती. त्या पैकी पहिला हप्ता म्हणून ३० कोटी लाखाचा निधी वितरण करण्यास राज्य शासनाने २२ जानेवारी रोजी शासन निर्णयानुसार मंजुरी दिली आहे.
दरम्यान, निधी प्राप्त झाल्याने महामंडळाकडून निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुशिक्षीत बेरोजगांराना थोडा दिलासा मिळाला आहे.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ व संत रोहिदास चर्माेद्योग व चर्मकार विकास महामंडळ या तीन महामंडळानी सन २०१४- १५ या आर्थिक वर्षा करीता केंद्र शासनाकडून विशेष केंद्रीय सहाय्य अनुदान म्हणून १०४ कोटी ४२ लाखाची अर्थ संकल्पीय तरदूत केली होती. त्या पैकी पहिला हप्ता म्हणून या तिन्ही महामंडळांना ३० कोटी १० लाख ७ हजाराचा निधी शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आला आहे.
त्यात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळास १२ कोटी ३ हजार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ १२ कोटी ३ हजार, संत रोहिदास विकास महामंडळ ६ कोटी १० लाख असा निधी मंजुर करण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यात या तीन महामंडळा पैकी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील १८८ लाभार्थ्यांच्या फाईली बँके कडून मंजूर होवून महामंडळाच्या अनुदाना अभावी रखडलेल्या होत्या, अनुदान नसल्याचे कारण लाभार्थ्यांना सांगण्यात येत होते. आता या महामंडळास १२ कोटीचे केंद्र सहाय्य अनुदान प्राप्त झाल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला.
विकास महामंडळाच्या पूर्वीच्या शासनाने नेमलेल्या अध्यक्षाचे पद रद्द झाल्याने या महामंडळावर नव्याने अध्यक्षाची निवड होणार आहे. अध्यक्षांची निवड झाल्यानंतरच कर्ज मंजूर कर्ज प्रकरण वाटप होणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता लाभार्थ्यांना महामंडळाचे अध्यक्षपद केव्हा भरते याची प्रतीक्षा लागली आहे.

Web Title: Provision of '104'; Given 30 Crore