शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामासाठी त्वरित पीक कर्ज द्या; औरंगाबाद खंडपीठाचे जिल्हा बँकेला निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 18:53 IST

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत  खरीप पीक कर्ज वाटप करताना औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक अगोदरच्या कर्जाचे व्याज कापून घेते किंवा व्याज दिल्याशिवाय पीक कर्ज वाटप करीत नाही.

ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला निर्देशयाचिका आणि अर्ज निकाली

औरंगाबाद  :  शासन निर्णयांचे पालन करून खरीप २०२० साठी शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज द्या, असे निर्देश देत औरंगाबाद खंडपीठाने जनहित याचिका आणि सर्व दिवाणी अर्ज निकाली काढले. व्याज वसूल केले असेल तर ते शेतकऱ्यांना परत करा, असे निर्देश न्या. एस.व्ही.  गंगापूरवाला आणि न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी बँकेला  दिले आहेत.

किशोर तांगडे या शेतकऱ्याने दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी १४ सप्टेंबर रोजी पूर्ण झाली होती. याचा निकाल खंडपीठाने ९ ऑक्टोबर रोजी जाहीर केला. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत  खरीप पीक कर्ज वाटप करताना औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक अगोदरच्या कर्जाचे व्याज कापून घेते किंवा व्याज दिल्याशिवाय पीक कर्ज वाटप करीत नाही. याबाबत कार्यवाही व्हावी,  अशी विनंती याचिकेत  केली होती.  पीक कर्ज देताना व्याजाची मागणी करणार नसल्याची लेखी हमी जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुनावणीदरम्यान दिली होती. तसेच शेतकऱ्यांकडून व्याजापोटी  वसूल केलेले ५ कोटी रुपये परत करण्याची प्रक्रिया चालू आहे. पीक कर्जासाठी ‘ना देय’ (नो ड्यूज )  ऐवजी ‘ना-हरकत’ (नो ऑब्जेक्शन)  प्रमाणपत्र घेऊ. आतापर्यंत ५५,१८४ शेतकऱ्यांना लाभ दिला आहे.  उर्वरित २०,१४३ प्रस्ताव सेवा सोसायटीकडून आल्यास त्यांनाही  पीक कर्ज देऊ, असे बँकेतर्फे निवेदन करण्यात आले होते. या सर्व बाबींचा  विचार करून खंडपीठाने २७ डिसेंबर २०१९, १७ जानेवारी २०२०  आणि २२ मे २०२० च्या शासन निर्णयांचे पालन करून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचे निर्देश दिले.

याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. सतीश तळेकर आणि ॲड. प्रज्ञा तळेकर,  बँकेतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख,  सेवा सोसायट्यातर्फे ॲड. विठ्ठल दिघे आणि शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी काम पाहिले. पीक कर्जाबाबतचे शासन निर्णय खंडपीठाने २७ डिसेंबर २०१९, १७ जानेवारी २०२०  आणि २२ मे २०२० च्या शासन निर्णयांचे पालन करून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचे निर्देश दिले आहेत. ते निर्णय असे आहेत. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या काळातील शेतकऱ्याचे २ लाखांपर्यंतचे कर्ज व त्यावरील व्याज माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने २७ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार घेतला होता. त्यानंतर राज्य शासनाने पीक कर्ज व त्यावरील व्याज माफ करण्याचा निर्णय ३१ मार्च २०१९ पासून ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत वाढवला होता; परंतु ३० सप्टेंबर २०१९ नंतर शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर व्याज आकारणी केल्यास संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतरही संबंधित शेतकऱ्यांचे कर्ज खाते निरंक होणार नाही.  योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामधील थकीत रकमेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी व्याजाची आकारणी करू नये, असा निर्णय घेतला होता.त्यानंतर, कोरोनाच्या उद्रेकामुळे कर्ज माफीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने पात्र शेतकऱ्यांना  २०२० च्या खरीप हंगामामध्ये नवीन पीक कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होतील. म्हणून राज्य शासनाने २२ मे २०२० च्या शासन निर्णयाद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर असलेली  रक्कम ‘शासनाकडून येणे दर्शवावी’ आणि शेतकऱ्यास खरीप २०२० साठी पीक कर्ज द्यावे, तसेच संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस असा निधी व्यजासहित शासनाकडून देण्यात येईल, असे निर्देश दिले होते.

टॅग्स :bankबँकfundsनिधीCrop Loanपीक कर्जAurangabadऔरंगाबाद