भावी डॉक्टर तरुणीच्या शिष्यवृत्तीचे ८० हजार पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 09:47 PM2019-02-21T21:47:02+5:302019-02-21T21:47:21+5:30

भावी डॉक्टर तरुणीच्या एटीएम कार्डचे क्लोन करून सायबर गुन्हेगारांनी ओरिसातील कटक येथील एटीएममधून तब्बल ८० हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला.

The prospective doctor favored 80,000 scholarships of the girl | भावी डॉक्टर तरुणीच्या शिष्यवृत्तीचे ८० हजार पळविले

भावी डॉक्टर तरुणीच्या शिष्यवृत्तीचे ८० हजार पळविले

googlenewsNext

औरंगाबाद : भावी डॉक्टर तरुणीच्या एटीएम कार्डचे क्लोन करून सायबर गुन्हेगारांनी ओरिसातील कटक येथील एटीएममधून तब्बल ८० हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. २५ जानेवारी रोजी झालेल्या या फसवणुकीची माहिती ५ फेब्रुवारी रोजी मिळाल्यानंतर तरुणीने याविषयी एसबीआय आणि सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. बँकेकडून सहकार्य न मिळाल्याने शेवटी तरुणीने वकिलांमार्फत बँकेला नोटीस बजावली आहे. दुसरीकडे ही बँकेची चूक असल्याचे स्पष्ट करून सायबर ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास नकार दिला.


उल्कानगरी येथील सहयोगनगरात राहणाऱ्या क ोमल चंदनसिंग परदेशी ही विद्यार्थिनी धुळे येथे वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेत आहे. शासनाकडून शिष्यवृत्ती मिळते म्हणून कोमलने उल्कानगरी शास्त्रीनगर येथील भारतीय स्टेट बँकेत बचत खाते उघडले. या बचत खात्यात शासनाने मागील आणि चालू वर्षाची शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली होती. पुढील शिक्षणासाठी हे पैसे लागणार असल्याने कोमलने त्या खात्यातून एक रुपयाही काढला नव्हता.

तिच्या खात्यात सुमारे १ लाख ४० हजार रुपये शिल्लक असताना २५ जानेवारी रोजी मध्यरात्री सायबर गुन्हेगारांनी चार वेळा २० हजार रुपये याप्रमाणे एकूण ८० हजार रुपये एटीएमद्वारे ओरिसामधील कटक येथे काढले. पैसे काढल्याचे मेसेज बँकेकडून कोमलला पाठविण्यात आले. मात्र तिने हे मेसेज वाचलेच नव्हते. कटक येथून झालेल्या व्यवहाराबाबत संशय आल्याने बँकेने कोमलचे एटीएम कार्ड ब्लॉक केले. त्याबाबतचा मेसेजही कोमलला पाठविला. दरम्यान ५ फेब्रुवारी रोजी कोमलने सहज मेसेज बॉक्समधील मेसेज वाचले असता आपल्या खात्यातून ८० हजार रुपये कोणीतरी काढल्याचे समजले. त्यानंतर तिने बॅँक मॅनेजर आणि बँकेच्या टोल फ्री नंबरवर याविषयी तक्रार केली. तेव्हा तुमच्या खात्यातून दोन वेळा पैसे काढण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात चार वेळा प्रत्येकी २० हजार रुपये काढण्यात आल्याचे पासबुक एंट्री आणि खात्यातील शिल्लक रकमेवरून दिसते. असे असताना तक्रार बंद करण्यात आल्याचे बँकेने त्यांना कळविले.

पोलीस आणि बँकेकडून टोलवाटोलवी
बँक व्यवस्थापकांनी याविषयी पोलिसांत तक्रार नोंदवून एफआयआरची प्रत दिल्यास पुढील कार्यवाही करतो, असे कोमल यांना सांगितले. तर ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी बँकेची असल्याने गुन्हा नोंदविता येणार नाही, असे स्पष्टीकरण देत सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांनी गुन्हा नोंदविण्यास नकार दिल्याचे कोमलने सदर प्रतिनिधीला सांगितले.
 

Web Title: The prospective doctor favored 80,000 scholarships of the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.