शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

फिर्यादी सापडत नसल्याने कोट्यवधींचा ऐवज वर्षानुवर्ष पोलीस ठाण्यात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:12 AM

: फिर्यादीच सापडत नसल्याने कोट्यवधी रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, वाहने आणि अन्य वस्तू, असा मुद्देमाल विविध ठाण्यांच्या तिजोरीत अनेक वर्षांपासून पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांचे आदेश : विशेष मोहीम राबवून तक्रारदारांचा शोध घेऊन १० लाखाचा ऐवज केला परत

औरंगाबाद : फिर्यादीच सापडत नसल्याने कोट्यवधी रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, वाहने आणि अन्य वस्तू, असा मुद्देमाल विविध ठाण्यांच्या तिजोरीत अनेक वर्षांपासून पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विशेष म्हणजे २६४ केसेसमध्ये न्यायालयाने दिलेल्या निकालात चोरट्यांकडून जप्त केलेला किमती ऐवज तक्रारदारांना परत करण्याचे आदेश दिले आहेत.शहरातील विविध भागांत चोऱ्या, घरफोड्या आणि वाहनचोरीच्या घटनांची नोंद होत असते. गुन्ह्याचा तपास करून चोरट्यांकडून मुद्देमाल जप्त केल्यानंतर संशयित आरोपींविरोधात न्यायालयात खटला दाखल केला जातो. खटल्याचा निकाल जाहीर करताना आरोपींकडून जप्त केलेल्या मुद्देमालासंदर्भात न्यायालय आदेश देतात. अशा प्रकारे औरंगाबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध ठाण्यांतील २६४ केसेसचा निकाल देताना न्यायालयाने चोरांकडून जप्त केलेले सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, वाहने अथवा अन्य वस्तू फिर्यादींना परत करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे अशा प्रकारचे आदेश पोलिसांना प्राप्त होऊन अनेक वर्षे उलटली. मात्र, अनेक खटल्यांचे निकालच पोलिसांपर्यंत आलेले नाहीत. परिणामी, चोरांकडून जप्त केलेला ऐवज ठाणेदारांच्याच ताब्यात आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी न्यायालयात प्रलंबित गुन्हे, न्यायालयाने दिलेले निकाल आणि आदेश, याबाबतची माहिती घेतली. तेव्हा केसचा निकाल लागून अनेक वर्षे उलटली तरी संबंधित ठाणेदारांनी २६४ केसेसमधील तक्रारदारांना त्यांचा ऐवज परत करण्याचा आदेश न्यायालयाने दिला असल्याचे समजले. याविषयी त्यांनी संबंधित ठाणेदारांकडून माहिती घेतली असता तक्रारदार सापडतच नसल्याने मुद्देमाल तक्रारदाराला देता आला नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.चौकट५५ जणांना वस्तू सन्मानपूर्वक परतचोरीला गेलेला ऐवज तक्रारदाराला लगेच परत मिळाला, तर त्याचे समाधान होईल, ही बाब लक्षात घेऊन तक्रारदारांचा शोध घेऊन त्यांना त्यांचा मुद्देमाल परत करा, असा आदेश आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिला. त्यामुळे शहरातील सर्व ठाणेदारांनी विशेष मोहीम राबवून ५५ तक्रारदार शोधून काढले. त्यांना सुमारे १० लाख ९८ हजार ३४१ रुपये किमतीच्या वस्तू पोलीस आयुक्त प्रसाद यांच्या हस्ते शुक्रवारी पोलीस आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात सन्मानपूर्वक परत केल्या. यावेळी उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्यासह सर्व ठाणेदारांची उपस्थिती होती.५५ तक्रारदारांना अकरा लाखांचा माल केला परतआयुक्तालयात शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात विविध ठाण्यांतील ५५ तक्रारदारांना १० लाख ९८ हजार ३४१ रुपयांचा माल पोलीस आयुक्तांच्या हस्ते परत केला. यात ५५४ ग्र्रॅम सोन्याचे दागिने, २५ मोटारसायकल आणि रिक्षा, ९ मोबाईल हॅण्डसेट, १ टॅब, १ लॅपटॉप आणि रोख ५६ हजार ४४५ रुपयांचा समावेश आहे....२३ वर्षांनंतर मिळाला चोरीचा ऐवजचोरट्यांनी १९९५ मध्ये सिडकोतील विष्णू कृष्णराव देशमुख यांचे घर फोडले होते. या घटनेत चोरट्यांनी चोरून नेलेली चांदीची समई, चांदीची ताटली, चांदीचे धूपपात्र (दोन), चांदीच्या तीन वाट्या, चांदीचे तीन चमचे, चांदीची गणपती मूर्ती, चांदीची महादेव पिंड आणि चांदीची मंगळागौर, अशा सुमारे ११ किलो ५०० ग्रॅम वजनाच्या वस्तू चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी संशयिताला सिडको पोलिसांनी अटक करून त्याच्याविरोधात न्यायालयात खटला भरला होता. या खटल्याचा निकाल २०१४ साली लागला. आजच्या कार्यक्रमात त्यांना त्यांच्या वस्तू तब्बल २३ वर्षांनंतर परत मिळाल्या.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी