प्रशासक नेमण्यासाठी प्रस्ताव
By Admin | Updated: August 13, 2015 00:24 IST2015-08-13T00:07:35+5:302015-08-13T00:24:45+5:30
निलंगा : दुष्काळामुळे निवडणूक घेण्याऐवजी निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय संचालक मंडळ नेमावे, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून

प्रशासक नेमण्यासाठी प्रस्ताव
निलंगा : दुष्काळामुळे निवडणूक घेण्याऐवजी निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय संचालक मंडळ नेमावे, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, स्थानिक आमदारांनी शासनाकडे नऊ जणांच्या प्रशासकीय मंडळासाठी शिफारस केली आहे.
निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपली आहे. त्यामुळे या बाजार समितीची निवडणूक सध्याची दुष्काळसदृश परिस्थिती पाहता घेऊ नये. संचालक मंडळ नियुक्त करावे, असा प्रस्ताव आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शासनाकडे पाठविला आहे. बाजार समितीचे चेअरमन म्हणून दगडोजी सोळुंके तर संचालक म्हणून प्रल्हाद देशमुख, अरविंद पाटील, राजकुमार सोनी, सिद्राम घोलप, शुभांगी कोळ्ळे, रामेश्वर होळकर, मधुकर माकणीकर, अंबादास जाधव यांची शिफारस केली असल्याचे समजते. याबाबत अधिकृत पत्र आले नसल्याचे दुय्यम सहाय्यक निबंधक एस.ई. गोगले व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संतोष पाटील यांनी सांगितले. अधिकृत दुजोरा मिळाला नसला, तरी ज्यांची प्रशासकीय मंडळात वर्णी लागली आहे, त्यांचा भाजप कार्यकर्ते मनोज कोळ्ळे यांच्या घरी सत्कार झाल्याचे समजते. (वार्ताहर)