ग्रामसमृध्दी योजनेसाठी १७५ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव
By Admin | Updated: July 14, 2014 01:00 IST2014-07-13T23:14:52+5:302014-07-14T01:00:23+5:30
बीड : पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेंतर्गत जिल्ह्यातील १७४ ग्रमापंचायतींचे प्रस्ताव शासनाच्या ग्रामीण विकास विभागाकडे पाठविण्यात आले आहेत़

ग्रामसमृध्दी योजनेसाठी १७५ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव
बीड : पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेंतर्गत जिल्ह्यातील १७४ ग्रमापंचायतींचे प्रस्ताव शासनाच्या ग्रामीण विकास विभागाकडे पाठविण्यात आले आहेत़ या ग्रामपंचायतींना लोकसंख्येनुसार रोख बक्षिसे मिळणार आहेत़
पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या उद्देशाने २०१०-११ मध्ये समृध्द ग्राम योजना सुरु केली़ या योजनेला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत़ सलग तीन वर्षे पर्यावरण संवर्धनासाठी परिश्रम घेणाऱ्या ग्रामपंचायतींना समृध्द ग्राम म्हणून जाहीर केले जाते़ त्यानंतर या ग्रामपंचायतींना पारितोषिकेही दिली जातात़ त्यानुसार पहिल्या वर्षी जिल्ह्यात १५० ग्रामपंचायतींनी निकष पूर्ण केले़ दुसऱ्या वर्षात १३ ग्रामपंचायती पात्र ठरल्या तर तिसऱ्या वर्षामध्ये १२ ग्रामपंचायतींनी निकष पूर्ण केले आहेत़ एकूण १७५ ग्रामपंचायतींनी बक्षिसासाठी आवश्यक असलेल्या अटी पूर्ण केलेल्या आहेत़ त्यामुळे त्यांना पहिल्या वर्षाचे अनुदान भेटणार आहे़ याशिवाय तिसऱ्या वर्षी त्यांनी निकष पूर्ण केले तर त्यांना अंतिम बक्षीस जाहीर करण्यात येणार आहे़ यासाठी १७५ ग्रा़पं़चे प्रस्ताव शासनाकडे पाठविले असल्याचे पंचायत विभागातील वरिष्ठ सहायक यु़ एम़ पठाण यांनी सांगितले़
जास्तीत जास्त ग्रा़पं़नी सहभाग नोंदवावा
जि़ प़ चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले, जिल्ह्यातील १७५ ग्रा़पं़चे प्रस्ताव गेले असले तरी आगामी काळात यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींनी योजनेत सहभाग नोंदवावा़ पर्यावरण समृध्दी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
या आहेत अटी
पहिल्या वर्षात ग्रा़पं़ हद्दीत ५० टक्के झाडे लावून जगवावीत
गावात ६० टक्के कुटुंबाकडे शौचालय असावे
कर वसुली, पाणीपट्टी, फेर आकारणी नियमाप्रमाणे केल्यास त्यानुसार ६० टक्के थकबाकीसह कर वसुली आवश्यक
५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी
प्रदूषणमुक्त उत्सव व्हावेत
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, यशवंत पंचायत राज अभियानात सहभाग हवा असे निकष असल्याचे पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी यांनी सांगितले़
तीन वर्षातील ग्रा़पं़
तालुकाग्रा़ पं़
वडवणी४
परळी२९
बीड११
माजलगाव२२
गेवराई११
अंबाजोगाई२२
आष्टी३३
शिरुर२८
केज५
धारुर४