शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

सातारा येथील खंडोबा मंदिरासाठी केंद्राकडे ६ कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 1:48 PM

पुरातत्व विभागाने १५ व्या वित्त आयोगातून सहा कोटींचा प्रस्ताव नव्याने केंद्राकडे पाठविला आहे.   

ठळक मुद्देतीन वर्षांपूर्वी मंदिराला एक कोटी पंधरा लाखांचा निधी आला होता.मंदिराची कामे न करताच निधी परत गेल्याने मंदिराची कामे रखडली आहेत.

- साहेबराव हिवराळे 

औरंगाबाद : सातारा येथील पुरातन हेमाडपंती खंडोबा मंदिरासाठी तीन वर्षांपूर्वी मंदिराला एक कोटी पंधरा लाखांचा निधी आला होता. परंतु दीपमाळ, सभामंडप व मंदिराची इतर कामे न करताच तो परत गेल्याने मंदिराची कामे रखडली आहेत. त्यामुळे पुरातत्व विभागाने १५ व्या वित्त आयोगातून सहा कोटींचा प्रस्ताव नव्याने केंद्राकडे पाठविला आहे.   

तत्कालीन ठेकेदाराने परवडत नसल्याने ते काम करण्यास नकार दिला होता. त्या आधारावर पुरातत्व विभागाने सदरील संस्थेला काळ्या यादीत टाकल्याचे समजते. टेंडर रिकॉल करूनही कुणीच पुढे आले नसल्याने निधी शासनाकडे परत गेला. अखेर वाढीव दराबाबत आणि कामाचा नवीन प्रस्ताव तयार करून राज्य शासनाने केंद्राकडे पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले. वातावरणातील बदलामुळे मंदिराच्या दीपमाळीचा खण निखळून पडला, तसेच चबुतऱ्याच्या दगडाचीही झीज होत असून, मंदिराच्या विटांचा मुलामा पाऊस, ऊन, वाऱ्यामुळे निघाले आहे.  

खंडोबा देवस्थानाला तीर्थस्थळाचा दर्जा मिळाला असून, मंदिराची देखभाल पुरातत्व विभागाकडे आहे. येथील कोणतेही कार्य करण्याची परवानगी देवस्थानाला नाही. त्यामुळे मंदिर परिसरात बांधकामास मदत करण्याची इच्छा असताना ते  करू शकत नाही. दीपमाळ व सभामंडपासह मंदिराची इतर कामे त्वरित हाती घ्यावीत, अशी मागणी होत आहे.  

मंदिराच्या कामाकडे लक्ष द्यावे अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील हे खंडोबा मंदिर आहे. हेमांडपंती मंदिरावर वातावरणाचा परिणाम होत असून, देखभालीची जबाबदारी पुरातत्व विभागाची आहे. पूर्वीचा निधी परत गेल्यामुळे नव्याने मिळणाऱ्या निधीला मंजुरी देऊन त्यातून मंदिराची शान वाढवावी. यात्रा उत्सव जवळ येत आहे, असे मंदिराचे अध्यक्ष साहेबराव पळसकर व ट्रस्टींचे म्हणणे आहे. 

मंजुरी अद्याप नाहीखंडोबा मंदिराची वास्तू जपण्यासाठी राज्य शासनामार्फत केंद्राकडे चार वर्षांच्या देखभालीसाठी ६ कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे. वास्तूत कोणताही बदल न करता खराब कामाचीच दुरुस्ती करावी. त्या प्रस्तावाला मंजुरी अद्याप आलेली नाही. परंतु मंजूर होऊन तो निधी प्राप्त झाल्यास मंदिराचे उर्वरित काम पूर्ण करण्यास विलंब लागणार नाही, असे पुरातत्व विभागाचे अधिकारी खंदारे यांनी सांगितले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSatara areaसातारा परिसरArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण