केंद्रीय विद्यापीठाच्या दर्जासाठी प्रस्ताव
By Admin | Updated: August 17, 2014 01:32 IST2014-08-17T01:32:18+5:302014-08-17T01:32:18+5:30
औरंगाबाद : केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळण्यासाठी हालचाली व्हाव्यात म्हणून मुख्यमंत्री राजेश टोपे व रावसाहेब दानवे यांना निमंत्रित करण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला.,

केंद्रीय विद्यापीठाच्या दर्जासाठी प्रस्ताव
औरंगाबाद : केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारमार्फत लवकर हालचाली व्हाव्यात म्हणून २३ आॅगस्ट रोजी होणाऱ्या विद्यापीठ वर्धापन दिन समारंभास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निमंत्रित करण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
याशिवाय उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्याचा ठरावही या बैठकीत मंजूर करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून उस्मानाबाद येथे विद्यापीठाचे उपकेंद्र कार्यरत आहे.
दोन वर्षांपूर्वी ताकवाले समितीने राज्यपालांकडे सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे की, एका विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त २०० महाविद्यालये असावीत. ज्यामुळे विद्यापीठाला महाविद्यालयांसोबत योग्य समन्वय साधता येईल.
सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात ३९४ महाविद्यालये कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यापीठाचे उपकेंद्र असलेल्या ठिकाणीच दुसरे स्वतंत्र विद्यापीठ कार्यान्वित करावे, या आशयाचा ठराव प्राचार्य डॉ. अशोक मोहेकर व संजय निंबाळकर यांनी व्यवस्थापन परिषदेत सादर केला. तो एकमताने मंजूर करण्यात आला.