शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव केंद्राकडे आलाच नाही"; भागवत कराडांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 11:41 IST

"उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी काहीलोक चुकीची माहिती देत आहेत."

औरंगाबाद: मराठवाड्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामकरणाचा मुद्दा जोर धरत आहे. दरम्यान, या शहरांच्या नामांतराचा कुठलाही प्रस्ताव केंद्राकडे आलेला नसून, काहीजण हवेत बाता मारत आहेत, असा गौप्यस्फोट केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केला आहे. 'लोकमत'शी बोलताना कराड यांनी ही माहिती दिली. 

'केंद्राकडे प्रस्ताव नाही'औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या 8 जून रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची घोषणा करतील असा दावा शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे करत आहेत. याबाबत डॉ. कराड यांना विचारले असता ते म्हणाले की, "कोणत्याही शहराच्या नामकरणाचा मुद्दा आधी राज्याच्या विधानसभेत मंजूर करुन, नंतर राज्य केंद्राकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवत असतो. शहराचे नाव बदलायचे असल्यास, त्यास रेल्वे, हवाई वाहतूक, पोस्ट खाते इत्यादी खात्यांची परवानगी लागते."

'राज्य सरकार राजकारण करत आहे'ते पुढे म्हणाले की, "माझ्या माहितीनुसार, राज्य सरकारने अद्याक अशाप्रकारचा कुठलाही प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी काहीलोक चुकीची माहिती देत आहेत. चंद्रकांत खैरे जो प्रचार करत आहेत, तो चुकीचा आहे. दोन्ही शहरांचे नावे बदलण्यासाठी आम्ही तयार आहोत, पण राज्य सरकार नावावरुन राजकारण करत आहे," असा आरोपही कराड यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतAurangabadऔरंगाबादUsmanabad S Pपोलीस अधीक्षक, उस्मानाबादChandrakant Khaireचंद्रकांत खैरे