शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

रहिवासी प्रमाणपत्रासाठी आता १९९५ चा पुरावा

By admin | Updated: September 18, 2014 00:41 IST

स. सो. खंडाळकर, औरंगाबाद सर्व धर्मांतील मागासवर्गीयांना जात पडताळणीसाठी आता रहिवासी प्रमाणपत्राचा १९९५ चा पुरावा पुरेसा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

स. सो. खंडाळकर, औरंगाबादसर्व धर्मांतील मागासवर्गीयांना जात पडताळणीसाठी आता रहिवासी प्रमाणपत्राचा १९९५ चा पुरावा पुरेसा असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी आॅर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. १९६७ चा पुरावा सादर करण्याच्या बंधनामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र करून घेणे अत्यंत जिकिरीचे होत असे. आता नव्या शासन निर्णयामुळे यात सुरळीतता आल्याशिवाय राहणार नाही. शासन निर्णय दि.९ आॅगस्ट १९९५ मधील परिच्छेद-२ नुसार या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट अ, ब, क मध्ये दर्शविलेल्या इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील जातींबाबत धार्मिक बंधन न लावता मुस्लिमसहित सर्व धर्मांतील व्यक्तींना, जे या प्रवर्गातील आहेत, त्यांना त्या त्या प्रवर्गासाठी मिळणाऱ्या सवलती हा शासन निर्णय निर्गमित केलेल्या दिनांकापासून म्हणजे दि.९ आॅगस्ट १९९५ पासून देण्यास शासन पुनश्च मान्यता देत आहे. तसेच सध्या राज्यात अस्तित्वात असलेले विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय, असे दोन प्रवर्ग पूर्वीप्रमाणे चालू ठेवण्यास व दोन प्रवर्गाला राज्य शासनाकडून मिळणारे फायदे चालू ठेवण्यास शासन मान्यता देत आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली होती. या बैठकीतच शब्बीर अन्सारी यांनी सर्व धर्मांतील मागासवर्गीयांना जात प्रमाणपत्रासाठी १९६७ ची वास्तव्याची अट शिथिल करण्याची मागणी केली होती. यावेळी अल्पसंख्याक विभागाचे अप्पर मुख्य सचिव पी.एस. मीना, आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे मुसा मुर्शद, हमीद अन्सारी, औरंगाबादचे मिर्झा अब्दुल कय्युम यांची उपस्थिती होती. याच बैठकीत, समाजकल्याण विभागाचे तत्कालीन सचिव जे.पी. डांगे यांनी दिलेल्या २० एप्रिल १९९८ च्या आदेशावरही सविस्तर चर्चा झाली. भिवंडी, जि. ठाणेमध्ये जात प्रमाणपत्रे व वैधता प्रमाणपत्रांची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. ते निकाली काढण्याचे व ही प्रमाणपत्रे देताना विलंब करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे ठरले होते. प्रत्यक्षात या निर्णयांची अंमलबजावणी किती झाली, हा संशोधनाचाच भाग ठरावा. १९६७ च्या ऐवजी १९९५ च्या पुराव्याची अंमलबजावणी नीटपणाने केल्यास जात पडताळणीविषयक ज्या अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत आणि ज्या वाढत्या तक्रारी आहेत, त्या कमी होण्यास मदत होईल.