बंधूभाव, सलोखा वृद्धींगत करा
By Admin | Updated: May 11, 2015 00:30 IST2015-05-11T00:25:40+5:302015-05-11T00:30:55+5:30
उस्मानाबाद : गावातील प्रश्न सामंजस्याने मिटवून ग्रामस्थांनी अपापसात बंधूभाव व सलोखा वृध्दींगत करावा़ सर्व जाती-धर्मांनी एकत्रित येवून सण-उत्सव साजरे करावेत़

बंधूभाव, सलोखा वृद्धींगत करा
उस्मानाबाद : गावातील प्रश्न सामंजस्याने मिटवून ग्रामस्थांनी अपापसात बंधूभाव व सलोखा वृध्दींगत करावा़ सर्व जाती-धर्मांनी एकत्रित येवून सण-उत्सव साजरे करावेत़ पोलीस पाटलांनी तंटामुक्त समितीची मदत घेवून सलोखा ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे यांनी केले़ अनसुर्डा येथे रविवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ़ नारनवरे यांनी अनसुर्डा येथे बैठक घेतली़ यावेळी पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड, समाज कल्याण अधिकारी अमीत घवले, नायब तहसीलदार राजेश जाधव, पोलीस उपाधीक्षक मोहन विधाते, सपोनि दंडे, पोलीस पाटील हरूण पटेल, बेंबळीचे उपसरपंच बाळासाहेब माने, मंडळ अधिकारी कुलकर्णी, तलाठी अंधारे, पांडुरंग माने आदी उपस्थित होते़ जिल्हाधिकारी म्हणाले, किरकोळ कारणावरून गावातील समाजात तेढ निर्माण होवून वाढ होतात़ उद्भवलेला वाद टाळण्यासाठी ज्येष्ठ मंडळींनी वेळीच हस्तक्षेप करून वाद सामंजस्याने मिटविण्याच्या कार्यात योगदान द्यावे़ युवकांनी गावच्या विकास कार्यायासाठी पुढे येवून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा़ शिवाय डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीनंतर गावातील घटनांमुळे समाजात तेढ निर्माण होवून तणाव निर्माण झाला होता़ प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे वाद संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे कौतुक करीत ग्रामस्थांना एकत्रित राहून विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले़ (प्रतिनिधी)