शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापक भरतीचे त्रांगडे काही सुटेना; कायदेशीर पेचामुळे ६०:४० चे सूत्रही बारगळण्याची शक्यता

By राम शिनगारे | Updated: December 19, 2025 16:25 IST

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यातील अनुदानित महाविद्यालयातील ५ हजार ११२ आणि विद्यापीठातील ७५० प्राध्यापकांची भरती ६०:४० च्या सूत्रांनुसार करण्याची घोषणा केली होती.

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील अकृषी विद्यापीठे व अनुदानित महाविद्यालयामधील प्राध्यापक भरतीचे त्रांगडे काही केल्या सुटत नसल्याचे चित्र आहे. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात निर्णय दिला आहे. त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने प्राध्यापक भरतीचे ठरविलेल्या ५०:५० टक्के सूत्रांमध्ये राज्यांना बदल करण्याचे अधिकारच नाहीत. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केलेले ६०:४० हे सूत्रही बारगळणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याविषयी निर्णय घेण्यासाठी बैठकांवर बैठकांचे सत्र सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यातील अनुदानित महाविद्यालयातील ५ हजार ११२ आणि विद्यापीठातील ७५० प्राध्यापकांची भरती ६०:४० च्या सूत्रांनुसार करण्याची घोषणा केली होती. त्यात ६० गुणभार शैक्षणिक प्रगतीसाठी आणि ४० गुणभार मुलाखत व सादरीकरणाला देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. त्याचवेळी आ. विक्रम काळे यांनी २७ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाचा निकाल देताना यूजीसीचे नियम देशभरातील मान्यताप्राप्त विद्यापीठांना लागू आहेत. त्यामुळे राज्यांना स्वतंत्र नियम बनवता येणार नाहीत, असा निर्णय दिल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावेळी मंत्री पाटील यांनी त्याविषयी तपासणी करून निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले. त्यानुसार मंत्रालयात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास केला असून, त्यात ५०:५० टक्के हेच सूत्र प्राध्यापक भरतीसाठी कायम ठेवावे लागणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे घोषणा झालेले ६०:४० हे सूत्रही बारगळणार असल्याची शक्यता आहे.

असे झाले भरतीच्या सूत्रांमध्ये बदलतत्कालीन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी विद्यापीठातील प्राध्यापक भरतीत गुणवत्ता आणण्यासाठी शैक्षणिक प्रगतीसाठी ८० आणि मुलाखतीसाठी २० गुण असा नियम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात बदल होऊन ७५:२५ असे सूत्र ठरले. त्यालाही मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यामुळे पुन्हा ६०:४० सूत्राची घोषणा झाली. त्यासही विविध संघटनांनी विरोध केला. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाचा निकालही समोर आल्यामुळे शासन कायदेशीर पेचात अडकल्याचेही समजते.

लवकरच तोडगाविधिमंडळाच्या अधिवेशनात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाने २७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्राध्यापक भरतीच्या नियमांसंदर्भात दिलेला निकाल विचारात घेऊनच प्राध्यापक भरतीचे सूत्र ठरविण्यात येणार आहे. त्याविषयी विचारविनिमय सुरू असून, लवकरच तोडगा काढण्यात येईल.- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण

English
हिंदी सारांश
Web Title : Professor recruitment trouble persists; 60:40 formula likely to fail.

Web Summary : Professor recruitment faces legal hurdles. UGC's 50:50 formula prevails, potentially nullifying the proposed 60:40 ratio. Supreme Court ruling restricts state-level modifications. Discussions are ongoing to resolve the impasse.
टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरProfessorप्राध्यापक