शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
5
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
6
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
7
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
8
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
9
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
10
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
11
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
12
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
13
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
14
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
15
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
16
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
17
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
18
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
19
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
20
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अंतरपिकातून घेतले लाखोंचे उत्पादन

By admin | Updated: December 15, 2014 00:47 IST

विलास भोसले, पाटोदा दरवाढीने किंवा दर खालावल्याने शेतकरी व ग्राहकांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या कांद्यानेच ऐन दुष्काळात शेतकरी चक्रपाणी जाधव यांना सावरले आहे.

विलास भोसले, पाटोदादरवाढीने किंवा दर खालावल्याने शेतकरी व ग्राहकांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या कांद्यानेच ऐन दुष्काळात शेतकरी चक्रपाणी जाधव यांना सावरले आहे.नैसर्गिक दुष्काळापेक्षा अडाणीपणा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळाला शेतकऱ्याला हालअपेष्टा, मानहानीस तोंड द्यावे लागत आहे. मात्र पाटोदा येथील चक्रपाणी यांनी चिकूच्या बागेत कांद्याचे अंतरपीक घेऊन सुमारे साडेतीन लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे. घरची परिस्थिती व्यवस्थित असतानाही केवळ आवडीपोटी चक्रपाणी यांनी शेती व्यवसायात पदार्पण केले. इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशनची पदविका त्यांनी घेतलेली आहे तर वडील अ‍ॅड. लक्ष्मण जाधव हे सभापती म्हणून राहिलेले आहेत. चक्रपाणी जाधव यांनी १९९३ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. मात्र शिकून गुलामगिरीची नोकरी करण्यापेक्षा त्यांनी स्वत: शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले. एक हेक्टर चिकूच्या बागेतच सुमारे १० लाख रुपयांचे उत्पन्न गतवर्षी घेतले आहे. तर यंदा पाणी कमी झाल्याने हाताश न होता ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. चिकूच्या बागेतच अंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली असून, त्यामधून सुमारे साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. गारपिटीमुळे यंदा चिकूची बाग उद्ध्वस्त झाली मात्र धीर न सोडता कांदा उत्पादन घेण्याचे त्यांनी ठरविले व त्यानुसार चिकूच्या बागेत कांद्याचे अंतरपीक घेतले. पिकांना खर्चिक व रासायनिक खाते वापरण्यापेक्षा कंपोस्ट, गांडूळ खताची निर्मिती करुन कांदा पिकाला दिली. तर विहिरीचे पुनर्भरण करुन नियोजनबद्ध पद्धतीने पाणीपुरवठा केला. बेरोजगारांनी नोकरीसाठी प्रयत्न करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीने व्यवसाय केल्यास तो फायद्यात राहील. शेतकऱ्यांनी अडाणीपणा सोडून प्रशासनाच्या योजनंचा लाभ घेण्याचे आवाहन चक्रपाणी जाधव यांनी केले.