पारितोषिक वितरण
By Admin | Updated: August 23, 2014 00:45 IST2014-08-22T23:53:11+5:302014-08-23T00:45:42+5:30
परभणी : शासनाचा जागर जाणीव पुरस्कार प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव व समन्वयक डॉ. सुधीर इंगळे यांना देण्यात आला.

पारितोषिक वितरण
परभणी : मुंबई येथील सिडनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात राज्याचे शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते शासनाचा जागर जाणीव पुरस्कार श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव व समन्वयक डॉ. सुधीर इंगळे यांना देण्यात आला.
उच्च शिक्षण विभागाच्या वतीने दोन वर्षापासून जागर जाणीव अभियानांतर्गत ही पारितोषिके दिली जातात. यावर्षीची तीन पारितोषिके श्री शिवाजी महाविद्यालयाने मिळविली आहेत.
यावेळी मुंबईच्या पोलिस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे, डॉ. प्र. रा. गायकवाड यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)