शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

मिनी घाटीचे खाजगीकरण?; धोरणनिश्चितीसाठी समितीची स्थापना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 19:44 IST

जालना रोडवरील, चिकलठाणा परिसरातील मिनी घाटी (जिल्हा सामान्य रुग्णालय) म्हणून बांधण्यात आलेल्या रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा घाट घातला जात असल्याचे वृत्त आहे.

- विकास राऊत  

औरंगाबाद : जालना रोडवरील, चिकलठाणा परिसरातील मिनी घाटी (जिल्हा सामान्य रुग्णालय) म्हणून बांधण्यात आलेल्या रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा घाट घातला जात असल्याचे वृत्त आहे. राज्यातील २०० बेड्सपेक्षा जास्त क्षमता असलेल्या सरकारी रुग्णालयांच्या खाजगीकरणाचा  विचार शासन दरबारी सुरू असून, त्यामध्ये या मिनी घाटी रुग्णालयाचा विचार करण्यात येण्याची दाट शक्यता आहे.  

२५ कोटी रुपयांच्या आसपास मिनी घाटीवर खर्च झाला असून, ३८ कोटींचे बजेट त्यासाठी मंजूर झाले आहे. सध्या तेथे वैद्यकीय मशिनरी आलेली नाही. सिटीस्कॅन बाहेरून करून घेण्याचा विचार सुरू आहे. बेड्सदेखील तेथे आलेले नाहीत. पाणीपुरवठ्याचा मुद्दाही सध्या बाजूला पडलेला आहे. त्यातच दोन वर्षांपासून त्या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. खाजगीकरणाच्या हालचालींमुळेच त्याचे उद्घाटन व यंत्रखरेदी लांबणीवर पडल्याचे स्पष्ट होत आहे. 

मिनी घाटीचे बांधकाम १८ महिन्यांत पूर्ण झाले. २०१५ पासून ते रुग्णसेवेत अर्पण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घाटीवरील रुग्णभार कमी करण्यासाठी मिनी घाटीचे बांधकाम केले. मेडिसिन, प्रसूती, सर्जरी, अपघात विभागाची व्यवस्था तेथे करण्यात आली आहे; परंतु त्याचे उद्घाटनच रखडले आहे. सध्या १ मे रोजी उद्घाटन होईल, अशी चर्चा आहे. याप्रकरणी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. दीपक सावंत  यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

खाजगीकरणाची कारणे अशीशासकीय सेवेत डॉक्टर येण्यास तयार नाहीत. जे डॉक्टर आहेत त्यातील काही जण खाजगी प्रॅक्टिससुद्धा करतात. सरकारी रुग्णालयात पुरेशी यंत्रसामग्री उपलब्ध नाही. रुग्णालयात औषधी उपलब्ध नाही. त्यामुळे राज्यातील २०० बेड्सहून अधिक रुग्णक्षमता असलेल्या  रुग्णालयांचे खाजगीकरण  करण्याचा विचार पुढे आला आहे. यावर समितीच्या अहवालानंतर सरकार निर्णय घेणार आहे. 

खाजगीकरणासाठी समितीसरकारी रुग्णालय व मेडिकल कॉलेजचे धोरण निश्चितीसाठी ठरविण्यात आलेल्या समितीमध्ये राज्य आरोग्य सेवा अभियान विभागाचे आयुक्त, आरोग्य विभागाचे सचिव, वैद्यकीय  शिक्षण व संशोधन विभागाच्या सचिवांचा समावेश आहे. ही समिती राज्यातील २०० बेड्सहून अधिक रुग्णक्षमता असलेल्या रुग्णालयांच्या खाजगीकरणाबाबत शासनाला तीन महिन्यांत अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर रुग्णालयांच्या खाजगीकरणाचा निर्णय होईल. गुजरातमध्ये अदानी एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशनकडून सरकारी रुग्णालये व  मेडिकल कॉलेज चालविण्यात येत आहेत. त्या सरकारने फाऊंडेशनसोबत एमओयू केलेला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालय व महाविद्यालयांच्या खाजगीकरणाचा घाट घातला जात आहे. 

मराठवाडा विकास मंडळाचा विरोधमराठवाडा विकास मंडळ सदस्यांनी शासनाच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. सरकारचे हे धोरण जनतेविरोधी असल्याचे पत्र सदस्यांनी राज्यपालांना पाठविले आहे. हे धोरण रद्द करण्याची मागणी सदस्यांनी केली आहे. मराठवाड्यासह राज्यातील २०० खाटांपेक्षा  जास्त रुग्णक्षमता असलेली सरकारी रुग्णालये खाजगी संस्था, कंपन्यांच्या हाती देण्याचे जवळपास निश्चित झाल्यासारखे वाटते आहे.

हा निर्णय सर्वसामान्य जनतेच्या हिताचा नाही. गरीब रुग्णांना आरोग्य सेवा देण्याच्या जबाबदारी व कर्तव्यातून सरकार पळ काढू पाहत आहे. सरकारी रुग्णालयांची दुरवस्था का होत आहे. तेथील भ्रष्टाचार निर्मूलनाकडे लक्ष देण्याऐवजी खाजगीकरणाचा उपाय शोधणे म्हणजे सर्वसामान्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्यासारखे आहे, असे मंडळ सदस्यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. 

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीHealthआरोग्यState Governmentराज्य सरकारmedicinesऔषधंdoctorडॉक्टर