छत्रपती संभाजीनगर: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज बुधवारी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर विशेष विमानाने आगमन झाले. राष्ट्रपतींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण जिल्ह्याची यंत्रणा 'अलर्ट' मोडवर होती.
विमानतळावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आगमन होताच राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, महापौर समीर राजुरकर, खासदार डॉ. कल्याणराव काळे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार अनुराधा चव्हाण, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि पोलीस आयुक्त प्रवीण पवार या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. राष्ट्रपती भवनाकडून मिळालेल्या विशेष परवानगीनुसार ठराविक ७ मान्यवरांनाच राष्ट्रपतींच्या स्वागत कक्षात प्रवेश देण्यात आला होता.
शेगावकडे रवानाविमानतळावरील औपचारिक स्वागतानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि राज्यपाल आचार्य देवव्रत हे भारतीय वायुसेनेच्या विशेष हेलिकॉप्टरने बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.
प्रशासनाची चोख तयारीराष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने विमानतळ इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते, तर महावितरणने अखंडित वीज पुरवठ्यासाठी विशेष अभियंत्यांची नियुक्ती केली होती. आणीबाणीच्या परिस्थितीसाठी घाटी आणि धूत रुग्णालयात विशेष बेड राखीव ठेवण्यासोबतच कार्डियाक ॲम्ब्युलन्सची व्यवस्थाही करण्यात आली होती.
Web Summary : President Murmu arrived in Chhatrapati Sambhajinagar, welcomed by Governor Devvrat and officials. Strict security was in place. She then departed for Shegaon by helicopter after brief welcome. Administration prepared for her visit with structural audits, power backup, and emergency medical services.
Web Summary : राष्ट्रपति मुर्मू छत्रपति संभाजीनगर पहुंचीं, राज्यपाल देवव्रत और अधिकारियों ने स्वागत किया। कड़ी सुरक्षा व्यवस्था थी। संक्षिप्त स्वागत के बाद वह हेलीकॉप्टर से शेगांव के लिए रवाना हो गईं। प्रशासन ने संरचनात्मक ऑडिट, बिजली बैकअप और आपातकालीन चिकित्सा सेवाओं के साथ उनकी यात्रा की तैयारी की।