पाणीटंचाई आराखडा तयार ठेवा
By Admin | Updated: July 12, 2014 00:39 IST2014-07-12T00:39:23+5:302014-07-12T00:39:23+5:30
नांदेड : संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता तालुकानिहाय पाणीटंचाई निवारणाचा आराखडा तयार ठेवण्याचे आदेश आज नांदेड येथे विभागीय महसूल आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिले़
पाणीटंचाई आराखडा तयार ठेवा
नांदेड : संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता तालुकानिहाय पाणीटंचाई निवारणाचा आराखडा तयार ठेवण्याचे आदेश आज नांदेड येथे विभागीय महसूल आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिले़
येथील नियोजन भवनात शुक्रवारी विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांची बैठक घेतली़ यंदा लांबलेल्या पावसाने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे़ या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त जयस्वाल यांनी पाणीटंचाई, पीक पेरणी व रोजगार हमी योजनेची कामे याविषयी उपाययोजना सूचविल्या़ या बैठकीस विभागीय उपायुक्त (पुरवठा) अनिल रामोड, विभागीय उपायुक्त (महसूल), जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी धीरजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, मनपा आयुक्त जी़ श्रीकांत यांची प्रमुख उपस्थिती होती़
तालुकानिहाय पाण्याचे सोर्स पाहून ठेवावेत व त्याचा आराखड्यात समावेश कारावा़ पाण्याचे टँकर्स कुठे भरता येतील, याचे नियोजन करावे़ पाणीटंचाईसंबंधी गावांची विभागणी करावी़ त्यामध्ये अतितीव्र पाणी टंचाई़ तीव्र पाणीटंचाई व काहीअंशी पाणीटंचाई अशी गावांची यादी तयार करावी़ तीन - तीन महिन्यांसाठी आराखडा तयार करावा़ त्यामध्ये टँकरने पाणीपुरवठा करणे, विंधन विहिरी घेणे व खाजगी विहिरींचे अधिग्रहण करणे याचा प्रामुख्याने समावेश असावा़ टँकर भरण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री खरेदी करून ठेवावी़ टँकरच्या किती खेपा होतात तसेच भारनियमन असेल तर जनरेटर व आईल इंजिन यांचेही नियोजन करावे़ पाणीटंचाई काळात ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळाले पाहिजे, अशा महत्त्वपूर्ण सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केल्या़
गावच्या २ कि़ मी़ च्या परिसरात ज्या विहिरांना पाणी असेल तर शासनाची परवानगी घ्यावी लागेल़ आवश्यक हातपंप बसविण्याची कार्यवाही पूर्ण करावी़ ज्या ठिकाणी विहीर व बोअर अधिग्रहण केले आहे, त्याचा दर पंधरा दिवसांनी ग्रामसभेत आढावा घ्यावा कारण पाण्याची आवश्यकता नसताना सुद्धा अधिग्रहण चालू असते, त्यासाठी पैसा गरज नसताना खर्च होतो, असेही विभागीय आयुक्तांनी सूचविले़ (प्रतिनिधी)
गावच्या २ कि़ मी़ च्या परिसरात ज्या विहिरांना पाणी असेल त्यांना शासनाची परवानगी घ्यावी़
तालुकानिहाय पाण्याचे सोर्स पाहून ठेवावेत व त्याचा आराखड्यात समावेश कारावा़ पाण्याचे टँकर्स कुठे भरता येतील, याचे नियोजन करावे़