शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

भुमरेंना पैठणमध्येच धोबीपछाड देण्याची तयारी; नगरपरिषदेत महाविकास आघाडीसाठी हालचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 19:28 IST

मविआचा प्रयोग निश्चितच भुमरे यांची डोकेदुखी वाढविणारा ठरू शकतो.

पैठण (औरंगाबाद): माजी मंत्री तथा युवसेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या बिडकीन दौऱ्यास शनिवारी मिळालेला पैठण तालुक्यातील शिवसैनिकांचा प्रतिसाद बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांच्या गोटात धडकी भरवणारा ठरला आहे. राजकीय पटलावरील अनिश्चिततेने बंडखोर व मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांचे समर्थक सध्या संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. त्यातच पैठण नगर परिषद निवडणुकीसाठी  महाविकास आघाडी करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. याद्वारे बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांना पैठणमध्येच धोबीपछाड मिळेल का? अशी चर्चा सुरु झाली आहे. 

आगामी नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणुकीला कसे सामोरे जावे लागेल, हक्काचे धनुष्यबाण चिन्ह मिळेल का ? गटासाठी वेगळे चिन्ह घ्यावे लागेल की भाजपा बरोबर जावे लागेल या विविध शक्यतेने भुमरे समर्थकांच्या मनात घालमेल सुरू आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. बिडकीनचे जिप सदस्य विजय चव्हाण, आपेगावचे जिप सदस्य ज्ञानेश्वर कापसे यांच्यासह कॉंग्रेसचे शहराध्यक्ष हसनोद्दीन कटयारे आदीनी दत्ता गोर्डे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस सुसाट सुटल्याचे अधोरेखित करीत आहे. मागच्या पंचवार्षिक नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाचे सुरज लोळगे यांनी शिवसेनेला धोबीपछाड देत शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा जवळपास दुप्पट मताधिक्याने विजय मिळवला होता. मात्र, यावेळी शिंदे गटाचे आणि भाजपचे सत्तेच्या माध्यमातून वर्चस्व विरुद्ध ठाकरे यांना मिळणारी सहानभूती, राष्ट्रवादी व कॉंग्रेसची रणनीती अशी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग ? पैठण तालुक्यात आमदार संदीपान भुमरे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दत्ता गोर्डे यांचे तगडे आव्हान आहे. आता आमदार भुमरे  व शिवसेना वेगवेगळी झाल्याने भुमरे यांना शह देण्यासाठी नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता गोर्डे, आप्पासाहेब निर्मळ कॉंग्रेसचे माजी मंत्री अनिल पटेल, विनोद तांबे, शिवसेनेचे प्रकाश वानोळे, राजू परदेशी यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी सहमती झाली तर महाविकास आघाडीचा प्रयोग अंमलात येऊ शकतो. मविआचा प्रयोग निश्चितच भुमरे यांची डोकेदुखी वाढविणारा ठरू शकतो.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा