माहुरात परिक्रमा यात्रेची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:25 IST2017-08-06T00:25:05+5:302017-08-06T00:25:05+5:30
राखी पौर्णिमेनिमित्त माहूर येथे भरणाºया परिक्रमा यात्रेनिमित्त लाखो भाविक दाखल होणार आहेत. यात्रेच्या तयारीची पाहणी संबंधित अधिकाºयांनी केली.

माहुरात परिक्रमा यात्रेची तयारी
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीक्षेत्र माहूर : राखी पौर्णिमेनिमित्त माहूर येथे भरणाºया परिक्रमा यात्रेनिमित्त लाखो भाविक दाखल होणार आहेत. यात्रेच्या तयारीची पाहणी संबंधित अधिकाºयांनी केली.
माहूर सह्याद्री पर्वतरांगावर ठिकठिकाणी देवीदेवतांचे मंदिर आणि मठ, आश्रमस्थळांच्या ऋृषीमुनीचे दर्शन घेऊन स्थानाभोवतीच्या ३६ किलोमीटरच्या परिघास प्रदक्षिणा(वेढा) घालून पुण्य पदरात पाडून घेण्याची लाखो भाविकांची श्रद्धा आहे. तसेच येथील वनौषधीच्या संपर्कात आल्याने अनेक असाध्य आजार बरे होतात, या भावनेतून ३६ कि.मी. ची परिक्रमा यात्रा राखी पौर्णिमेच्या दिवशी काढण्यात येते. यात्रा नियोजन समितीचे अध्यक्ष तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली.
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाकडून ३४ पॉर्इंट बनविण्यात आले आहेत. भोकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी वाळके यांच्यासह दोन पोलीस निरीक्षक, ९ पोलीस उपनिरीक्षक, ११० पोलीस कर्मचारी, २४ महिला पोलीस, १० वाहतूक पोलीस यासोबतच बिनतारी संच, वॉकीटॉकी, लाईट व्हॅन, मोबाईल व्हॅन तयार ठेवण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळातर्फे ७० बसेसची व्यवस्था केली. गडावर खाजगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
आरोग्य विभागाकडून पाच रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहेत तर महावितरणकडून अखंड वीज पुरवठा सुरु ठेवण्यात येणार आहे.