संशोधनासाठी इंग्रजीला प्राधान्य

By Admin | Updated: August 20, 2014 00:58 IST2014-08-20T00:36:01+5:302014-08-20T00:58:40+5:30

औरंगाबाद : पीएच.डी. पूर्वपरीक्षा (पेट) २८ सप्टेंबर रोजी होणार असून आज कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. ‘

Preferred English to Research | संशोधनासाठी इंग्रजीला प्राधान्य

संशोधनासाठी इंग्रजीला प्राधान्य

औरंगाबाद : पीएच.डी. पूर्वपरीक्षा (पेट) २८ सप्टेंबर रोजी होणार असून आज कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. ‘पेट’साठी आता आणखी विलंब बरा नाही, अशी भूमिका घेत कुलगुरूंनी पत्रकार परिषदेत या परीक्षेचा दिनांक जाहीर केला. दरम्यान, ‘लोकमत’ने आज मंगळवारीच २८ सप्टेंबर रोजी ‘पेट’ आयोजित केली जाणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते.
‘नेट’च्या धरतीवर ‘पेट’ घेतली जाईल, असे सांगून कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले की, या परीक्षेसाठी दोन पेपर राहतील. दोन्ही पेपरमध्ये विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. दोन्ही पेपरमध्ये पास होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ४०, तर सर्व राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ३५ गुणांची अट आहे. या परीक्षेत मराठा व मुस्लिम विद्यार्थ्यांना शासनाने जाहीर केलेले आरक्षण लागू असेल.
यासंदर्भात ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे व परीक्षा नियंत्रक कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी सांगितले की, १५ दिवसांच्या आत ‘पेट’चा निकाल जाहीर करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. विद्यापीठात ‘पेट’संबंधी स्वतंत्र विभाग कार्यरत करण्यात आला असून डॉ. माधव सोनटक्के व डॉ. सचिन देशमुख या दोघा जणांवर समन्वयक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापुढे वर्षातून दोन वेळा ‘पेट’ आयोजित करण्यासंबंधी कुलगुरू डॉ. चोपडे यांनी धोरणात्मक निर्णय घेतला असल्याची माहिती दिली.
यावेळी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल कुलगुरूंनी सांगितले की, ‘पेट’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संशोधनासाठी आता अधिक प्रतीक्षा करावी लागणार नाही. प्राचार्य डॉ. अशोक मोहेकर यांच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार ‘पेट’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दोन वर्षांची वैैधता मान्य करण्यात आली आहे. याशिवाय त्यांना अन्य ठिकाणी संशोधन करता यावे, यासाठी त्या विद्यार्थ्यांना ‘पेट’ उत्तीर्णतेचे विद्यापीठ प्रमाणपत्रही देईल. मार्गदर्शकांकडे असलेल्या शिल्लक जागांचा आढावा लवकरच घेऊन तो ‘वेबसाईट’वर प्रसिद्ध केला जाणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Web Title: Preferred English to Research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.