शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

आता रंगणार पूर्व विदर्भाच्या पाण्याचा खेळ

By admin | Updated: July 20, 2016 00:27 IST

औरंगाबाद : मराठवाड्याच्या पाणीप्रश्नात आता पूर्व विदर्भातील पाण्याची भर पडणार आहे. पूर्व विदर्भातील जादा पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार

औरंगाबाद : मराठवाड्याच्या पाणीप्रश्नात आता पूर्व विदर्भातील पाण्याची भर पडणार आहे. पूर्व विदर्भातील जादा पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून देण्याची तयारी नागपूर येथील एका स्वयंसेवी संस्थेने दाखविली असून, त्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी केली आहे. विशेष म्हणजे या संस्थेला ही रक्कम द्यावी, यासाठी मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मराठवाडा विकास मंडळावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.नगर, नाशिक जिल्ह्यांतून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी देण्यास विरोध होत असताना आता पूर्व विदर्भातील जादा पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचे प्रयत्न होत आहेत. पूर्व विदर्भाच्या गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांतून वाहणाऱ्या वैनगंगा आणि वर्धा या नद्या पुढे प्राणहिता या नदीस मिळतात. प्राणहिता नदीचे पाणी उपसा पद्धतीने हिंगोली, परभणी व जालना जिल्ह्यांत आणता येऊ शकते. मराठवाडा विकास मंडळाने त्यासाठी पाठपुरावा सुरूकेला असतानाच नागपूरच्या सेंटर फॉर रुरल वेलफेअर (पान ५ वर)पूर्व विदर्भातील जादा पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी अहवाल तयार करण्याची तयारी सेंटर फॉर रुरल वेलफेअर या संस्थेने दाखविली आहे. त्यासाठी २५ लाख रुपयांच्या निधीची मागणीही केली आहे. मंडळाच्या बैठकीत संस्थेचा प्रस्ताव समोर आल्यानंतर चर्चा करून निर्णय घेतला जाईल.- उमाकांत दांगट, विभागीय आयुक्त तथा अध्यक्ष मराठवाडा विकास मंडळपूर्व विदर्भातील पाणी मराठवाड्यात आणता येऊ शकते. हिंगोली, परभणी आणि जालना या जिल्ह्यांना याचा फायदा होऊ शकतो. नागपूर येथील संस्थेने त्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून देण्याची तयारी दर्शविली आहे. या संस्थेने मागितलेली २५ लाख रुपयांची रक्कम तुलनेने खूप जास्त असून, ती देणे अयोग्य आहे. अहवालासाठी या संस्थेस ३ ते ५ लाख रुपये दिल्यास वावगे ठरणार नाही.- शंकरराव नागरे, सदस्य मराठवाडा विकास मंडळलांबून पाणी आणण्याच्या कोणत्याही योजना आगामी काळात यशस्वी होणार नाहीत, अशा योजनांची कामे निधीअभावी अर्धवट राहतील. पर्यावरण खात्याचीही त्यांना मान्यता मिळणार नाही. कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आले, परंतु प्रत्यक्षात पाणी मिळालेच नाही. पूर्व विदर्भातील पाण्याचेही असेच होईल. विशेष म्हणजे यामुळे राजकीय, सामाजिक व आर्थिक प्रश्नही निर्माण होऊ शकतात.- प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ