सुवासिनींनी केली प्रार्थना

By Admin | Updated: June 20, 2016 00:58 IST2016-06-19T23:33:40+5:302016-06-20T00:58:47+5:30

औरंगाबाद : पती-पत्नीच्या नात्यातील स्नेहबंध दृढ करणारा वटपौर्णिमा सण शहरात उत्साहात साजरा करण्याता आला.

Prayers made by suvasinii | सुवासिनींनी केली प्रार्थना

सुवासिनींनी केली प्रार्थना

औरंगाबाद : पती-पत्नीच्या नात्यातील स्नेहबंध दृढ करणारा वटपौर्णिमा सण शहरात उत्साहात साजरा करण्याता आला. वटवृक्षाची पूजा करून ‘जन्मोजन्मी हाच पती मिळावा’अशी प्रार्थना सुवासिनींनी केली.
वटपौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच महिलांची लगबग सुरू झाली होती. पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत ग्राहकांनी गर्दी केली होती. आंबे, हळदी-कुंकू, दोरा इ. पूजेचे सामान ताटात घेऊन सुवासिनी परिसरातील वटवृक्षाकडे जात होत्या. गटागटाने सुवासिनी वटवृक्षाजवळ पोहोचत होत्या. तिथे पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाची पूजा करण्यात येत होती.
जन्मोजन्मी हाच पती मिळावा व पतीच्या दीर्घायुष्यासाठी यावेळी सुवासिनींनी प्रार्थना केली. पूजेनंतर एकमेकींना सौभाग्याचे लेणे हळद -कुंकू लावले जात होते. सिडको, हडको, जवाहर कॉलनी, गारखेडा परिसर, उस्मानपुरा, बेगमपुरा, रेल्वेस्टेशन, औरंगपुरा परिसर, पैठण रोड, जळगाव रोड, विद्यापीठ परिसर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, हर्सूल जटवाडा रोड इ. भागांतील वटवृक्षांची त्या-त्या भागातील सुवासिनींनी पूजा केली. यामुळे वटवृक्षांना चोहोबाजूंनी दोरे बांधलेले दिसून येत होते.

Web Title: Prayers made by suvasinii