शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

प्रतीशिवाजींना मोगलांनी डांबले होते धारूरच्या किल्ल्यात!

By admin | Updated: February 19, 2015 00:45 IST

प्रताप नलावडे , बीड इतिहासात ज्यांचा उल्लेख प्रतीशिवाजी असा केला जायचा, त्या नेताजी पालकर यांना आठ महिने धारूरच्या किल्ल्यात मोगलांनी स्थानबध्द करून ठेवले होते

प्रताप नलावडे , बीडइतिहासात ज्यांचा उल्लेख प्रतीशिवाजी असा केला जायचा, त्या नेताजी पालकर यांना आठ महिने धारूरच्या किल्ल्यात मोगलांनी स्थानबध्द करून ठेवले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट संबंध या किल्ल्याशी कधीच आलेला नसला तरी त्यांचे चुलते व वडील धारूरच्या किल्ल्याचे काही काळासाठी सुभेदार असल्याचे पुरावे इतिहासात आढळतात. हा किल्ला सातवाहनापासून ते अगदी निजामशाहीपर्यंतच्या अनेक घडामोडींची साक्ष आजही देत आहे. इतिहासाचे अभ्यासक आणि संशोधक डॉ. सतीश साळुंके यांनीही शिवाजी महाराजांचा थेट संबंध बीड परिसराशी कधीच आलेला नव्हता, असे सांगतानाच नेताजी पालकर, महाराजांचे वडील शहाजीराजे आणि चुलते मालोजीराजे यांचा मात्र या परिसराशी निकटचा संबंध आला असल्याचे सांगितले. हिंदवी स्वराज्याचे दीर्घकाळ सरनौबत असणारे आणि अनेक लढायांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणारे नेताजी पालकर हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. पन्हाळ्याच्या मोहिमेतवेळेत न पोहोचल्यामुळे मराठी सैन्याची मोठी हानी झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या महाराजांनी समयास कैसा पावला नाहीस, असे म्हणत त्यांना बडतर्फ केले. यानंतर पालकर मोगलांना जाऊन मिळाले. मोगलांनी त्यांना धारूरच्या किल्ल्यात वास्तव्यास ठेवले. तब्बल आठ महिने पालकर या किल्ल्यात वास्तव्यास होते. महाराजांनी आग्रा येथून सुटका करून घेतल्यानंतर ‘सिवा सुटला आता प्रतीसिवा सुटता कामा नये’ असे म्हणत औरंगजेबाने पालकरांच्या अटकेचे आदेश काढले तो दिवस होता १९ आॅगस्ट १६६६. त्यावेळी पालकर मोगलांच्या छावणीत होते. मोगलांनी २४ आॅगस्टला त्यांना धारूरच्या किल्ल्यातच अटक केली. धारूरचा किल्ला हा भूईकोट किल्ला असला तरी भक्कम तटबंदी आणि चोहोबाजंूनी खंदकाचा वेढा असल्याने मुगलांना राज्यातील इतर किल्ल्यापेक्षा हा किल्ला खूपच सुरक्षित असल्याचे वाटत होते. त्यामुळेच पालकरांना अटक केल्यानंतरही काही काळ तेथेच ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना आग्रा येथे औरंगजेबासमोर हजर करण्यात आले. औरंगजेबाने त्यांचा अनन्वीत छळ करून पुढे त्यांना काबुल-कंदहारच्या मोहिमेवर रवाना केले. पुढे नऊ वर्षे ते या मोहिमेवर होते. दरम्यान काबुल मोहिमेनंतर दिलेरखानसोबत त्यांना मराठी मुलुखात पाठविण्यात आले. पालकर यांना चुकीच्या निर्णयाचा पश्चाताप झाल्याने त्यांनी मे १६७६ मध्ये मोगली छावणीतून पलायन करत महाराजांकडे धाव घेतली. त्यांनीही तितक्याच विश्वासाने पालकरांना पुन्हा सैन्यात सामील करून घेतले.हिंदवी स्वराज्याचे दीर्घकाळ सरनौबत.४शिवाजी महाराजांचे उजवे हात म्हणून ओळख.४प्रतापगडावरील अफझलखान वधावेळी त्याची फौज पळवून लावण्याची मोठी कामगिरी.४अनेक लढाया जिंकल्या. महाराजांसारखेच शौर्य असल्याने प्रतीशिवाजी अशी त्यांची ओळख बनली होती.धारूर शहर हे अगदी सातवाहन काळापासून एक व्यापारी पेठ म्हणून प्रसिध्द होते. याच काळात शहराच्या सुरक्षिततेच्या विचारातून येथे किल्ला बांधण्यात आला. त्यावेळी त्याला महादुर्ग असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर पुढे आदिलशाही, मुगलशाही आणि निजामशाहीची स्थित्यंतरे या किल्ल्याने पाहिली. मोगलांनी धारूरचे नाव बदलून फतेहाबाद असे केले होते. आदिलशाहीत या किल्ल्याचेच दगड आणि माती वापरून पुन्हा १५६७ मध्ये याच ठिकाणी बांधकाम केले.