औरंगाबादचा प्रणव बनला राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत चॅम्पियन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 19:31 IST2021-01-30T19:29:59+5:302021-01-30T19:31:28+5:30
१६ वर्षांखालील ए. आय. टी. ए. राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत औरंगाबादचा प्रणव कोरडे चॅम्पियन बनला.

औरंगाबादचा प्रणव बनला राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत चॅम्पियन
औरंगाबाद : इंदौर येथे शुक्रवारी झालेल्या १६ वर्षांखालील ए. आय. टी. ए. राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत औरंगाबादचा प्रणव कोरडे चॅम्पियन बनला. या स्पर्धेत त्याने दुहेरीतही उपविजेतेपद पटकावले. प्रणव कोरडे याने आज झालेल्या १६ वर्षांखालील वयोगटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या सर्वेश झंवर याचा ६/२, ६/३ असा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली.
अंतिम फेरीत पोहोचण्याआधी प्रणवने उपांत्यपूर्व फेरीत नील जोगळेकर याच्यावर ६/४, ६/७, ६/१ आणि उपांत्य फेरीत मध्य प्रदेशच्या अविरल शर्मा याच्यावर ६/४, ७/६ अशी मात केली होती. या स्पर्धेत प्रणवने दुहेरीत जयनीशच्या साथीने उपविजेतेपद पटकावले. प्रणवला वाय. एस. के. टेनिस ॲकॅडमीचे प्रशिक्षक राहुल उगलमुगले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल त्याचे युवराज खेडकर व संजीव बालय्या यांनी अभिनंदन केले.