महाराष्ट्र प्रांतच्या अध्यक्षपदी प्रमोद कासलीवाल नियुक्त

By Admin | Updated: June 9, 2014 01:09 IST2014-06-09T00:53:47+5:302014-06-09T01:09:57+5:30

कचनेर : भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी, महाराष्ट्र प्रांतच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. प्रमोद जमनलाल कासलीवाल यांची मतदान प्रक्रियेद्वारे रविवारी निवड करण्यात आली.

Pramod Kasliwal appointed as president of Maharashtra province | महाराष्ट्र प्रांतच्या अध्यक्षपदी प्रमोद कासलीवाल नियुक्त

महाराष्ट्र प्रांतच्या अध्यक्षपदी प्रमोद कासलीवाल नियुक्त

कचनेर : भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी, महाराष्ट्र प्रांतच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. प्रमोद जमनलाल कासलीवाल यांची मतदान प्रक्रियेद्वारे रविवारी निवड करण्यात आली.
श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर येथे आज अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी ही निवडणूक घेण्यात आली. यासाठी संपूर्ण राज्यातून समाजबांधव आले होते. निर्वाचन अधिकारी म्हणून निवृत्त अप्पर पोलीस महासंचालक पी.के. जैन यांनी काम पाहिले. एकूण ४२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर मतमोजणी होऊन या निवडणुकीत औरंगाबाद येथील रहिवासी व अतिशय क्षेत्र कचनेरचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद कासलीवाल यांची निवड घोषित करण्यात आली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीपकुमार प्रभाकर घेवारे (मुंबई) यांचा पराभव केला.
यानंतर विजयी मिरवणूक काढण्यात आली. अ‍ॅड. कासलीवाल यांनी चिंतामणी पार्श्वनाथ भगवंतांचे सपत्नीक दर्शन घेतले. यानंतर अतिशय क्षेत्र कचनेर विश्वस्त कार्यकारिणी मंडळ, जटवाडा, पैठण, विश्वस्त मंडळ, नागपूर, मुंबई, पुणे, जळगाव, सांगली, सातारा, इचलकरंजी, नांदेड, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, उस्मानाबाद, फलटण आदी ठिकाणच्या समाजबांधवांच्या वतीने अ‍ॅड. कासलीवाल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारास उत्तर देताना त्यांनी महाराष्ट्रातील जैन तीर्थक्षेत्रांच्या रक्षणासाठी सदैव प्रयत्नशील राहील असे सांगितले.
निवडणुकीसाठी कचनेरचे विश्वस्त मंडळ, कार्यकारिणी मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले, तसेच चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रिया थोरात, फौजदार राठोड, बापू चव्हाण यांच्यासह क्षेत्राचे कर्मचारी, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे औरंगाबाद शहरास प्रथमच अध्यक्षपद मिळाले आहे. (वार्ताहर)

Web Title: Pramod Kasliwal appointed as president of Maharashtra province

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.