परभणीत राकाँचे रास्ता रोको आंदोलन

By Admin | Updated: March 16, 2016 08:30 IST2016-03-16T08:29:50+5:302016-03-16T08:30:15+5:30

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी वसमत रस्त्यावर दुपारी १२ च्या सुमारास एक तास रास्ता रोको आंदोलन केले़

Prabhinit Rakan Rachna Roko Roko movement | परभणीत राकाँचे रास्ता रोको आंदोलन

परभणीत राकाँचे रास्ता रोको आंदोलन

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना अटक केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी वसमत रस्त्यावर दुपारी १२ च्या सुमारास एक तास रास्ता रोको आंदोलन केले़ या आंदोलनामुळे वाहतूक जाम झाली होती़
महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे ईडी संचालनालयाच्या चौकशीला सहकार्य करीत असतानाही राजकीय सूडबुद्धीतून त्यांना अटक करण्यात आली़ पुरोगामी नेतृत्वाचे खच्चीकरण करण्याचा सरकारचा मानस या कृतीतून सिद्ध झाल्याचा आरोप करीत परभणीमध्ये राकाँ कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले़ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ स्वराजसिंह परिहार, जिल्हा परिषदेतील राकाँचे गटनेते बाळासाहेब जामकर यांच्यासह तालुकाध्यक्ष सुरेश भुमरे, नानासाहेब राऊत, चक्रधर उगले, रामेश्वर जावळे, मुंजाभाऊ गायकवाड, अ‍ॅड़ विष्णू नवले, अली खान, अनिल गोरे, गंगाधर जवंजाळ, दत्ताभाऊ काळे, शंकर भागवत, बंडू म्हेत्रे, एऩआय़ काळे व कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला़

Web Title: Prabhinit Rakan Rachna Roko Roko movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.