पं.स. सभापती पदाचे आरक्षण जाहीर
By Admin | Updated: August 20, 2014 01:51 IST2014-08-20T01:28:43+5:302014-08-20T01:51:22+5:30
उस्मानाबाद : पंचायत समिती सभापतींचे आरक्षण मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले. उस्मानाबाद, लोहारा आणि भूम येथील सभापतीपद खुल्या गटासाठी सुटले आहे.

पं.स. सभापती पदाचे आरक्षण जाहीर
उस्मानाबाद : पंचायत समिती सभापतींचे आरक्षण मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले. उस्मानाबाद, लोहारा आणि भूम येथील सभापतीपद खुल्या गटासाठी सुटले आहे. त्यामुळे या ठिकाणी चुरस पहावयास मिळणार आहे.
जिल्ह्यामध्ये आठ पंचायत समित्या आहेत. या सर्व पंचायत समिती सभापंतीचे आरक्षण जाहीर करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या कैै. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर करण्यात आले.
यामध्ये उस्मानाबाद पंचायत समितीचे सभापतीपद खुल्या गटासाठी सुटले आहे. तसेच तुळजापूर पं.स.चे ओबीसी प्रवर्गासाठी, कळंब पंचायत समिती एससी प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले आहे. उमरगा पंचायत समितीचे पद खुल्या गटातील महिलांसाठी राखीव आहे. लोहारा आणि भूम पंचायत समितीचे खुल्या गटासाठी सुटले आहे. वाशी पंचायत समिती सभापतीपदी विराजमान होण्याची संधी खुल्या गटातील महिलेला मिळणार आहे. त्याचप्रमाणे परंडा पंचायत समिती सभापती पद हे ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. हे आरक्षण पुढील अडीच वर्षासाठी लागू असणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. उस्मानाबाद, लोहारा आणि भूम या तिन्ही ठिकाणची सभापतीपदे ही खुल्या गटासाठी सुटल्याने या ठिकाणी इच्छुकांची भाऊगर्दी होणार असून मोठी चुरस निर्माण होणार आहे.