शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पं.स. इमारतीचे महिन्यात दोनदा झाले लोकार्पण !

By admin | Updated: August 31, 2014 01:08 IST

प्रकाश मिरगे , जाफराबाद तालुक्यात विकास कामांचे श्रेय घेण्याचे राजकारण सुरु असून जाफराबाद पंचायत समिती कार्यालय नवीन इमारतीचे एक महिन्याच्या अंतरावर दोनदा लोकार्पण कार्यक्रम झाल्याने

प्रकाश मिरगे , जाफराबादतालुक्यात विकास कामांचे श्रेय घेण्याचे राजकारण सुरु असून जाफराबाद पंचायत समिती कार्यालय नवीन इमारतीचे एक महिन्याच्या अंतरावर दोनदा लोकार्पण कार्यक्रम झाल्याने सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. दोन कोटी रुपये खर्च करुन भव्य इमारत उभी दिसत असल्याचे पाहून श्रेय घेण्याकरीता प्रमुख राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.लोकार्पण सोहळा ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व पालकमंत्री राजेश टोपे, आ. चंद्रकांत दानवे प्रमुख अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार होता. मात्र जयंत पाटील न आल्याने पालकमंत्री यांच्या हस्ते ३० आॅगस्ट रोजी कार्यक्रम घेण्यात आला. याच नवीन इमारतीतचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पा. दानवे, जि. प. अध्यक्ष आशाताई भुतेकर, उपाध्यक्ष राहुल लोणीकर, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष दानवे यांच्या उपस्थितीत २६ जुलै रोजी घेण्यात आला.पंचायत समिती कार्यालयाचे भूमिपूजन कार्यक्रम देखील अशाच प्रकारचा रंगला होता. पंचायत समितीमध्ये भाजप-सेना युतीची सत्ता आहे. त्यामुळे त्यांना आपल्या सोयीनुसार हा कार्यक्रम घेऊन आमचा अधिकार असल्याचे सांगितले. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसने राज्यात आमची सत्ता आहे, म्हणून प्रशासकीय नियमानुसार तो आमचा अधिकार आहे, असे सांगून खरा प्रशासकीय लोकार्पण सोहळा झाला, अशी चर्चा देखील कार्यकर्त्यांमध्ये होती.आ. चंद्रकांत दानवे यांच्या विकास निधीमधून नवीन डांबरीकरण रस्ता चिखली रोड ते रेपाळा, सिद्धार्थ महाविद्यालय रस्त्याचे लोकार्पण जाफराबाद ग्रामपंचायत अंतर्गत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. परंतु कार्यक्रम प्रसंगी राकॉँचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश चव्हाण यांचे नाव नामफलकावर कोठेच दिसून आले नाही.मतदार संघात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष यांची आघाडी असताना कॉँग्रेसला या कार्यक्रमात कोठेच स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात दोन्ही कॉँग्रेसमध्ये मोठी दरी निर्माण होऊन अधिक संघर्ष वाढणार असल्याचे चिन्हे दिसू लागले आहे.जाफराबाद तालुक्यात लोकप्रतिनिधी यांच्याकडून झालेल्या कामाचे श्रेय कसे घ्यायचे यासाठी स्पर्धा सुरु आहे. तर दुसरीकडे तालुक्याला जोडल्या जाणाऱ्या व शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या प्रमुख राज्य महामार्ग रस्त्याची दयनीय अवस्था आहे. शहरात बांधकाम विभागाचा काही ठिकाणी रस्ताच शिल्लक नाही. चिखली जाणारा महामार्ग डांबरीकरण रस्ता संपूर्ण खड्ड्यांनी व्यापून गेला अहे. याकडे कोणी लक्ष देत नाही. अशा रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी होऊन अनेक कार्यक्रम घ्यावे, अशी चर्चा सुध्दा आता यानिमित्ताने होऊ लागली आहे. या प्रकाराने तालुक्यातील जनतेचे मात्र चांगलेच मनोरंजन होत आहे. पंचायत समितीची इमारत दोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आली आहे. मात्र त्याचे श्रेय घेण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व पालकमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत इमारत लोकार्पणाचे दोन वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. त्यास शासकीय अधिकारी उपस्थित होते. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने मतदारसंघातील विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरूर् झाली आहे. त्यासाठी दावे-प्रतिदावेही केले जात आहेत. यामुळे मात्र तालुक्यातील जनतेचे चांगलेच मनोरंजन होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.