शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
3
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
4
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
5
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
6
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
7
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
8
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
9
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
10
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
11
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
12
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
13
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
14
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
15
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
16
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
17
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
18
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
19
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
20
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज

अंतिम वर्षाची ऑनलाईन परीक्षा देत असतानाच वीज गेली; विद्यार्थ्याचे वर्ष वाया गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 18:28 IST

विद्यार्थी पुणे येथील एमआयटी कॉलेजमध्ये बीएस्सी नॉटिकल सायन्सची अंतिम वर्षाची परीक्षा देत होता.

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून दुरुस्ती चालूच महावितरणच्या एका चुकीमुळे मुलाचे पदवीचे एका वर्षाचे नुकसान झाले

औरंगाबाद : महावितरणने गुरुवारी आॅनलाईन शिकणाऱ्या व परीक्षार्थींना शॉक दिला. देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली सातारा परिसरासह विविध भागांतील वीजपुरवठा खंडित करण्याता आला. मात्र, या प्रकारामुळे बीड बायपासवरील छत्रपतीनगरात अंतिम वर्षाची आॅनलाईन परीक्षा देत असताना वीज गेल्याने विद्यार्थी परीक्षेला मुकल्याची घटना घडली.

देवळाई फिडरचा वीजपुरवठा गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता बंद करण्यात आला. या फिडरवरील आलोकनगर, छत्रपतीनगर, बीड बायपास परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. याच परिसरातील रहिवासी असलेले अरुण गल्हाटे यांचा मुलगा विनीत पुणे येथील एमआयटी कॉलेजमध्ये बीएस्सी नॉटिकल सायन्सची अंतिम वर्षाची परीक्षा देत होता. गुरुवारी शेवटचा नेव्हिगेशनचा आॅनलाईन पेपर सुरू होता. सकाळी दहा ते दुपारी दोन परीक्षेचा कालावधी होता. दहा वाजता आॅनलाईन परीक्षा सुरू झाली. अर्ध्या तासातच लाईट गेली. त्यामुळे पदवीचे वर्ष गमावल्याचा संताप या विद्यार्थ्यासह त्याच्या पालकांनी व्यक्त केला. महावितरणच्या एका चुकीमुळे मुलाचे पदवीचे एका वर्षाचे नुकसान झाले, असे गल्हाटे यांनी सांगितले.

अनेकांना बसला फटकाविविध भागांतील वीजपुरवठा दुपारी चार वाजेपर्यंत बंद होता. त्यामुळे आॅनलाईन शिक्षण घेणाऱ्या व देणाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांनाही असाच मनस्ताप सहन करावा लागला आहे. विद्यापीठाच्या होणाऱ्या आॅनलाईन परीक्षा आणि क्लासेस यांच्या नियोजनात महावितरणशी समन्वय साधण्याची गरज असल्याचेही पालकांनी ‘लोकमत’ला सांगितले.

विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून नियोजन गरजेचेसध्या विविध शहरांत शिक्षण घेणारे, वर्क फ्रॉम होम काम करणारे नोकरदार शहरात आले आहेत. आता परीक्षांचा काळ सुरू आहे. बहुतांश लोकांचे आॅनलाईन क्लासेससह कामे चालतात. त्यामुळे विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून वीजपुरवठ्याचे नियोजन गरजेचे आहे. कार्यालयीन वेळेत वीजपुरवठा सुरळीत मिळणे, तसेच विद्यापीठ, शिक्षण विभागाशी महावितरणचा समन्वय गरजेचा आहे.-अरुण गल्हाटे, परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्याचे पालक

पूर्वनियोजित देखभाल-दुरुस्तीपूर्वनियोजित देखभाल-दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्याविषयी ग्राहकांना मेसेज आणि जाहिरातीद्वारे माहिती दिली गेली आहे. देवळाई फिडरचा पुरवठा बंद होता. आलोकनगर, छत्रपतीनगर, आयप्पा मंदिर परिसर, रेणुकामाता मंदिर परिसर, म्हस्के पेट्रोल पंप परिसरातील वीजपुरवठा बंद होता.-अविनाश चव्हाण, सहायक अभियंता, सातारा शाखा, महावितरण 

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षणmahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी