मानदेऊळगावात जोडणी नसतानाही आले वीज बिल

By Admin | Updated: August 21, 2014 01:19 IST2014-08-21T00:51:18+5:302014-08-21T01:19:55+5:30

जालना : महावितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा बिल ग्राहकांच्या माथी मारण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. त्यात आता आणखी एक नवा प्रताप समोर आला आहे.

Power bill coming in the absence of connection to Malegaon | मानदेऊळगावात जोडणी नसतानाही आले वीज बिल

मानदेऊळगावात जोडणी नसतानाही आले वीज बिल



जालना : महावितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा बिल ग्राहकांच्या माथी मारण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. त्यात आता आणखी एक नवा प्रताप समोर आला आहे. घरात विजेअभावी अंधार असताना व वीज जोडणी घेतलेली नसतानाही महावितरणने विजेचे बिल दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला हे बिल देण्यात आले. त्याव्यक्तीने आठ महिन्यांपूर्वीच वीजमीटर मिळावे म्हणून रितसर अर्ज करून कोटेशन भरलेले आहे. मात्र आठ महिने उलटूनही महावितरणने अद्यापपर्यंत वीजजोडणी तर दिली नाही मात्र बिल माथी मारले आहे.
बदनापूर तालुक्यातील मानदेऊळगाव येथील शेषराव संभाजी डोळसे हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवतात. त्यांनी घरात वीजजोडणी मिळावी म्हणून रितसर अर्ज करून ५५० रूपयांचे कोटेशन भरलेले आहे. १२ डिसेंबर २०१३ रोजी त्यांनी हे कोटेशन भरले. त्याची पावती नं. ००९३३ आहे. त्यावेळी पावतीवर ग्राहक क्रं. ५१०१८०००१९०३ असा पावतीवर लिहून देण्यात आला होता. त्यांना महावितरणचे लाईनमन येवून विज जोडणी करून मीटर बसवून देतील असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात आठ महिने झाले तरी महावितरणने वीजजोडणी दिलेली नाही. मात्र डोळसे यांनी भरलेल्या कोटेशनच्या आधारे त्यांना ३६० रुपयाचे बिल देण्यात आले. त्यावर ग्राहक क्रमांक (कोटेशन प्रमाणे) टाकण्यात आला. तसेच चालू रिंडींग आर. एन. ए. , मागील रिडींग १ व एकून युनिटचा वापर ८० दाखवून त्याचे ३६० रूपये बिल देण्यात आले.बिल भरण्याची शेवटची तारीख २५ आॅगस्ट देण्यात आली. (वार्ताहर)

साहेबराव डोळसे यांनी वीज जोडणीसाठी कोटेशन भरूनही त्यांना वीज जोडणी देण्यात आलेली नाही. त्यासाठी आपली मोलमजुरी सोडून त्यांनी अनेक वेळा महावितरणच्या कार्यालयात चकरा मारल्याचे सांगितले. तसेच दोन दिवसांपापूर्वी चक्क हातात बिल आल्याने आपण थक्क झालोत, याबाबतही महावितरणच्या कार्यालयात चकरा मारून पुरवठा नसताना बिल कसे आले असा जाब विचारला असता कोणी उत्तर देण्यास तयार नाहीत.

सदर ग्राहकाकडे वीजमीटर नाही, जोडणीही केलेली नाही. त्यांनी ती मिळावी म्हणून रितसर अर्ज करून नियमाप्रमाणे कोटेशन भरलेले आहे. महावितरणने त्यांना जोडणी तर दिलीच नाही उलट विजेचे बिलच दिले. त्यावरून महावितरणमध्ये सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचा नमुना समोर आला. महावितरणने बिल रिडिंगसाठी स्वतंत्र एजन्सी नेमलेली असल्याचे सांगितले जाते. महावितरणचे अधीक्षक अभियंता पानढवळे यांना विचारले असता, मला याविषयी काही माहिती नाही. तालुका अभियंत्यांना विचारा असे सांगून जास्त बोलणे टाळले.

Web Title: Power bill coming in the absence of connection to Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.